#AnandTeltumbde
आनंद तेलतुंबडे यांना अटक-काय आहे वास्तव?
१. आनंद तेलतुंबडे यांना केलेल्या अटकेला कोरेगाव भीमा चा संदर्भ आहे.कोरेगाव भीमा मधील हिंसेला भिडे-एकबोटे जबाबदार होते असा आरोप झाला पण त्याची काडीचीही चौकशी भाजप सरकारने केली नाही
२.एल्गार परिषद,जी वर्णवर्चस्ववादी..(1/8)
पेशवाई पराभूत होण्याचा, २०० वा सोहळा साजरा करण्यासाठी आयोजित केली होती. तिला भाजप सरकारने हिंसेसाठी दोषी धरले.
३. आनंद तेलतुंबडे या परिषदेशी संबंधित नव्हते. उलट त्यांनी त्यावर एक टीकात्मक लेख लिहला होता.
४. कोरेगाव भीमा हिंसा आणि पंतप्रधानांचा हत्या करण्याचा कट,..(2/8)
यासंदर्भात कोणीतरी कोणाला तरी लिहलेल्या पत्रात 'आनंद' म्हणून व्यक्तीचा उल्लेख आहे असे पोलिसांचे म्हणणे आहे. ते 'आनंद' म्हणजे आनंद तेलतुंबडे असा निष्कर्ष पोलिसांनी काढला. याला कसलाही आधार नाही. तेलतुंबडे यांच्या घरातून कसलाही पुरावा पोलिसांना सापडलेला नाही. म्हणूनच...(3/8)
म्हणूनच न्यायमूर्ती चंद्रचूड यांनीही तो धुडकावून लावला होता. परंतु 'बंदिस्त लिफाफ्यात' पोलिसांनी काही तरी दिले आणि इतर न्यायमूर्तींनी ते मान्य केले!
५. आयपीसी अंतर्गत एफआरआय दाखल केला गेला असता तर केव्हाच जामीन मिळाला असता. पण अनलॉफुल ऍकटीविटीज प्रेव्हेंशन ऍक्ट (UAPA)..(4/8)
अंतर्गत हि केस असल्यामुळे जामीन मिळणे दुरापास्त आहे.
६. संघ विचारविरोधी असणारे कार्यकर्ते,पत्रकार,वकील, आंबेडकरी विचारवंताचा राजकीय छळ( persecution) करणे हा हेतू भाजप सरकारचा होता आणि आहे. म्हणूनच महाविकास आघाडी सरकार या प्रकरणाची इत्यंभूत चौकशी करणार होते. पण त्यामुळे..(5/8)
एका रात्रीत केंद्राने हि केस एनआयए कडे वर्ग केली!
७. आनंद तेलतुंबडे हे पब्लिक इंटेलेक्च्युअल आहेत. त्यांनी सातत्याने संघ-भाजप चे विकृत, फॅसिस्ट स्वरूप दाखवून दिले आहे. त्यांच्या विचारांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे.
८. जेव्हा या केस ची सुनावणी सुरु होईल तेव्हा..(6/8)
तेलतुंबडे निर्दोष सूटतील यात शंका नाही. बाकी आज ना उद्या संघ-भाजप च्या या कटकारस्थानाचे पितळ उघडे पडणार आहेच!
९. शेवटी एक ऐतिहासिक नोंद- १९२६ ला इटली मध्ये ग्राम्स्की या विचारवंताला मुसोलिनीने अटक केली होती. २०२० ला त्याच पद्धतीने आनंद तेलतुंबडे यांना ..(7/8)
अटक केली गेली आहे. बाकी मुसोलिनीचे पुढे काय झाले आपल्याला माहित आहेच! (8/8)
#म #मराठी
You can follow @BhausahebAjabe.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: