#Thread

आज बाबासाहेब आंबेडकर जयंती ! काल पासून मी अनेक लोकांच्या स्टेट्स वर बाबासाहेबांचे वेग वेगळे फोटोज, गाणी बघत आहे ! कुणी बाबासाहेबांच्या DEGREE बद्दल बोलत तर कुणी त्यांनी कसा संघर्ष या बद्दल बोलत आहे. या सगळ्यात मला एक गोष्ट कुठेच दिसली नाही.
#AmbedkarJayanti2020
(1/11)
ती म्हणजे आपण त्यांच्या कडून काय शिकलो ! आज बाबासाहेबांचे नाव अनेक लोक राजकारण करण्यासाठी वापरतात,स्वतःची पोळी भाजून घ्यायला म्हणून त्यांचे नाव घेतात ! लोक काहीही करतात आणि मग सोयीस्कर रित्या त्यातून बाहेर पडण्याकरता बाबासाहेबांचे नाव घेतात.
(2/11)
आपण आपल्या देशात घडणारी आंदोलने बघा,प्रत्येक ठिकाणी जे जे लोक असतात ते ते बाबासाहेबानी हे सांगितले,ते सांगितले म्हणून ओरडत राहतात ! पण यातल्या एकालाही बाबासाहेबानी आपल्याला काय शिकवले याची काडीमात्र कल्पना नसते
(3/11)
@ashish_ghanghav भाऊ यांनी लिहलेल्या थ्रेड मधून त्यांनी बाबासाहेबानी दिलेल्या 'शिका,संघर्ष करा आणि संघटित व्हा' वाक्याचा अर्थ अगदी स्पष्ट पणे समजावून सांगितलं आहे.पण अनेक लोक शिका हा शब्द सोयीस्कर रित्या,
'संघटित व्हा आणि संघर्ष करा' एवढेच दोन शब्द लक्षात ठेवतात.
(4/11)
आज अनेक जण बाबासाहेबांच्या नावाखाली हिंदू धर्माला नावं ठेवताना दिसतात. माझ्या वाचना प्रमाणे बाबासाहेब हिंदू विरोधी मुळीच नव्हते तर ते शुद्रांवर झालेल्या अत्याचारा विरुद्ध बोलत होते,तसे तर सावकार पण याच विचाराचे होते !
(5/11)
पण अनेक लोक स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी बाबासाहेबाना हिंदू विरोधी दाखवण्याचा प्रयत्न करतात !
जाती जाती मध्ये फूट राहू नये या साठी बाबासाहेबानी खूप प्रयत्न केला पण मी हे अगदी स्पष्ट पणे बोलतो कि त्यांचे अनुयायी म्हणणारेच मला सर्वात जास्ती 'जातीयवादी वाटले.
(6/11)
आपण आपल्या महापुरुषांच्या जीवनातून काय शिकलो या बद्दल कुणीच विचार करत नाही,पण त्यांच्या नावाखाली राजकारण कसे करता येईल या बद्दल मात्र आपण कायम तत्पर असतो.दलित विरुद्ध ब्राम्हण अशी जी मानसिकता निर्माण करण्यात अली आहे याला आधी आळा घातला पाहिजे.
(7/11)
आपण प्रत्येक जण एक आहोत आणि आपल्या प्रत्येकाला 'संघर्ष करून,संघटित व्हायचे आहे',संघर्ष कश्या साठी ? संघर्ष समाजतल्या विषमतांशी आणि संघटित कशासाठी ? संघटित भारताच्या मूळ संस्कृती,जपण्यासाठी! हे वरील माझे वयक्तिक विचार आहेत!
(8/11)
संपूर्ण आयुष्यात बाबासाहेबानी अनेक अनेक पुस्तक वाचली,ते ज्ञानी झाले ! त्या ज्ञानाचा वापर करून त्यांनी लोकांपर्यंत ते ज्ञान पोहोचावे या साठी कार्य केले!
(9/11)
समाजतल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत 'शिक्षण' पोहोचावे या साठी अनेक सोयी केल्या पण आत्ता आपण पाहतो आहोत कि या सोयीचा लोक गैरवापर करत आहेत.
(10/11)
असो,आज आपण प्रत्येकानी एक पण करूयात,कि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या चरित्राचा अभ्यास करून,राजकारण पलीकडे जाऊन आपण बाबासाहेब जसे आहेत तसे जगासमोर आणूयात !
सर्वाना बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
घरी राहा,सुरक्षित राहा !
जय हिंद
(11/11)
You can follow @malhar_pandey.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: