११ मार्च ला अमेरिकन औषध सर्व्योच संस्था FDA रात्री उशिरा अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प ह्यांना कोरोना विषयी काही गोळ्यांचे आणि उपचारांचे तपशील पाठवून देते. त्यात Hydroxychloroquinn आणि azithromycin ह्या दोन मलेरिया संबंधित दिल्या जाणाऱ्या औषांधांचा विशेष उल्लेख असतो.
आणि त्याच नंतर ह्या hydroxychloroquine ह्या गोळी विषयी माहिती सर्व देशात प्रसारित होवू लागते, ही गोळी प्रामुख्याने मलेरिया anti dose म्हणून वापरली जाते. आणि ह्यांचे सगळ्यात जास्त उत्पादन भारत आणि काही आशियायी देश करत असतात. भारतात आज ही मलेरिया हा खूप जास्ती प्रमाणात आहे.
त्याच कारणामुळे आपल्या कडे ह्याचे उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणात केले जाते. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या गोळी बनवायला लागणारा कच्चा माल भारतातच तयार केला जातो त्यामुळे उत्पादन जास्त आणि स्वस्तात तयार केली जाते. आपण फार पूर्वी पासून म्हणजे ७० वर्ष पासून ही गोळी तयार करतोय.
त्याच मुळे आपण हीची जास्तीत जास्त चांगली आणि परिणामकारक आवृत्ती तयार केली आहे जी अतिशय उत्तम प्रकारे मेलेरिया आजार आवाक्यात आणण्यात खूप महत्वाची भूमिका बजावत आहे. Chloroquine चे derivative म्हणजे खूप साम्य असणारे फॉर्म म्हणजे hydroxychloroquine.
आपण सध्या जे कोरोंनं उपचारात सतत ऐकत आहोत ती हेच hydroxychloroquine ज्याचा वापर करतोय , आपण chloroquine he औषध नाही वापरत कारण हे खूप घातक टॉक्सिक औषध आहे. ह्या औषधविषय सगळ्यात पहिल्यांदा झनियांग युनिव्हर्सिटी चीन आणि मग फ्रान्स कडून अधिकृत रित्या पहिल्यांदा माहिती पडले.
फ्रान्स विरीलॉजी विभाग ह्यांनी ८० पेशंट वर ह्या औषधाचा वापर azithromycin ह्या दुसऱ्या औषढासोबत केला आणि चक्क ७२ रुग्ण बरे झाले ह्याचा अहवाल तयार केला. आणि हाच प्रयोग नंतर अमेरिकेत काही इन्स्टिट्यूट ने पण केला , आपण पूर्णपणे तर छातीठोक पने सांगू शकत नाही पण ह्या घडीला हे औषध
कोरोन वर प्रभावी ठरत आहे. प्रश्न आहे मग ह्याचे उपचार सर्वच रुग्णावर अमेरिका किंवा इतर देश करणार काय? तर सध्या तरी होय असेच आहे. कारण भारतात ह्या औषध विषयी काटेकोर पने आयसीएमआर नॅशनल टास्क फोर्स भारतीय सर्वोच्य संस्था काही guideline दिल्या आहेत. सरसकट वापरावर बंदी आहे.
जयपूर मध्ये दोन इटालियन रुग्ण त्यांचा परवानगी घेवून भारतीय डॉक्टर्स ह्यांनी hyadroxychloroquine आणि एड्स वर वापरली जाणारी Lopinavir आणि ritonavir ह्यांच्या वापराने बरी केली. पण पुढे जावून ह्या पैकी एकाचा हृदयविकार ने मृत्यू ओढवला. म्हणजे शंका घ्याला वाव आहेच.
मग आत्ता नक्की ह्या गोळ्यांची मागणी अमेरिका का करत आहे. सर्वात पहिले म्हणजे कोरोंन वर सध्या ठोस लस उपलब्ध नाही, ह्या औषधावर सध्या तरी ट्रायल घेण्यासाठी वेळ नाही, जगात मृतुंचा आकडा वाढतोय, मग आहे त्या ऑप्शन मध्ये जास्तीत जास्त लोकांना बरे करणे हा एकमेव मार्ग उपलब्ध आहे.
आत्ता थोडे भारता विषयी.
भारत सरकार ने ह्या गोळी वर काटेकोर निर्बंध जाहीर केले आहेत. फक्त high risk लोकांसाठी च ह्यांची परवानगी दिली आहे ती पण फक्त A symptomatic
लोक आणि कॅटेगरी B symptomatic.
म्हणजे पहिला प्रकारात डॉक्टर नर्स आणि वॉर्डबोय जे इलाज करत आहेत आणि सतत रुग्णाच्या
संपर्कात येत आहेत, टाइप B - प्रकारात अशी व्यक्ती जी कोरोन्ना रुग्णाच्या आसपास किंवा काही कारणामुळे संपर्कात आली आहे पण अजुन लक्षण विरहित आहे. फक्त ह्या दोन प्रकारात ह्या गोळ्यांची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे चुकून पण कोणीही डॉक्टर ला न विचारता ह्या घातक गोळ्या घेवू नये.
नक्की hydroxychloroquine कोरोना वर कशी काम करते. तर ही गोळी प्रथम संसर्गित रुग्णाला दिल्या नंतर त्याचा शरीरात ती कोरोन विषाणू वर हल्ला करून त्याची तीव्रता कमी करते आणि मग तेवढ्या वेळेत आपलीच शरीर स्वतः स्वतःचे अँटिबायोटिक्स निर्माण करून त्याचाशी लढते. आणि त्याच वेळी तुमच्या
शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी औषधे दिली जातात, म्हणजे चौफेर कोरोना विरोधी यंत्रणा तयार केली जाते आणि तुम्ही रोग मुक्त होता. त्या मुळेच कदाचित hydroxychlorquine हे नेमके औषध असेलच असे नाही , पण सध्या जे हातात आहे , त्याचाच वापर केला जातोय हे नक्की.
Hydroxychloroquine ची साईड इफेक्ट.
हे chloroquine ह्याचे च एक रूप असल्यामुळे फार घातक सुद्धा आहे. ह्या औषधाने चिडचिड , मळमळ, डोकेदुखी, त्वचा खाज , नाकातून रक्त येणे , आणि डोळ्यांचे आजार कदाचित दृष्टी जाणे , हृदय झटका येणे इतके परिणाम समोर आहेत. त्यातले त्या त दृष्टी जाणे कन्फर्म
म्हणून स्वतच्या मर्जीने जावून औषधे सेवन करणे म्हणजे मृत्य स निमंत्रण देणे. आज आपल्या भारतात प्रत्येक मेडिकल मध्ये हे औषध सहज उपलब्ध आहे, त्यामुळे ह्याचा वापर अजिबात करू नका. जीवनाशी खेळू नका. प्रत्येक डॉक्टर हे औषध देताना त्याचे डोस ठरवत असतो. त्यामुळे कोरोना खरेच बरा होतो
फक्त ह्या औषधाने तर हा गैर समज आहे. विविध उपचार आहेत , पद्धती आहेत ज्या मुळे आपण कोरोनो मुक्त होत आहोत, एड्स ची दोन औषधे वर सांगितल्या प्रमाणे सुद्धा खूप परिणामारकतेने कोरनो बरा करत आहेत. तसेच व्हिटॅमिन C औषधे शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढवून कोरोना पासून बचाव करत आहेत.
त्यामुळे
Hydroxychloroquine हे औषध फक्त कोरोनोचा असर कमी करतेय पण पूर्ण परिणामकारक सिद्ध होतेय किंवा नाही हे खूप साऱ्या टेस्ट आणि ट्रायल च ठरवू शकतात, ज्याला आत्ता अजिबात वेळ नाही. राष्ट्रपती ट्रम्प ह्या गोळीला The Game Changer , बोललं आहेत ते किती खरे हे येणारा काळच ठरवेल.
🙏🙏
You can follow @dreamzunite.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: