औरंगाबाद शहरात हाहाकार माजवणारा 'सारी' Severe acute respiratory infections (SARIs) रोगाबद्द इथे जाणुन घेऊया. जगभरात हाहाकार माजवणार्या करोना एवजी औरंगाबाद शहरात सध्या सारी या रोगाने मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
अत्तापर्यंत शहरात गेल्या तेरा दिवसांत दहा रुग्णांचा मृत्यूमुखी झाला आहे हा आजार सर्दी, ताप, खोकला यातून निर्माण होतो. या आजाराची लागण झाल्यानंतर दाेनच दिवसांतच अशा रुग्णांची तब्येत चिंताजनक होते. त्यातच त्याचा मृत्यू होतो तसेच नेमकी हीच लक्षणे कोरोनातही दिसतात.
देशभर केलेल्या अभ्यासात ‘सारी’ हा आजार असलेल्या ५ हजार ९११ पैकी १०४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यात महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांतील २१ जणांचा समावेश आहे.
'सारी’ची लक्षणे काेराेना सारखी आहेत.
- श्वास घ्यायला त्रास
- खूप ताप, सर्दी, खाेकला
- फुप्फुसात सूज येणे
- कमी काळात पेशंट सिरियस हाेताे
- वयाेवृद्ध व्यक्ती, बालके व राेगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्यांत त्याचा फैलाव लवकर हाेताे.
'सारी’बाबत पडलेल्या प्रश्नांची तज्ञांकडून उत्तरे.

प्रश्न. काेराेनाप्रमाणे ‘सारी’ही साथराेग आहे का?
उत्तर- नाही, परंतु इन्फेक्शन होऊ शकते. मात्र मृताला कोणते इन्फेक्शन झाले आहे ते स्पष्ट नाही. रिपाेर्ट आल्यानंतरच डिटेल केस स्टडी करता येऊ शकते.
Q. ‘सारी’ची लागण प्रथमच झाली आहे का?

A. नाही. ‘सारी’चे पेशंट नेहमीच असतात, कोरोनाचीच लक्षणे ‘सारी’मध्ये आढळतात. संबंधित रुग्णाला काेराेनामुळे ‘सारी’ची लागण झाली हाेती का याची तपासणी केली जात आहे. ‘सारी’ हा इतर व्हायरस बॅक्टेरियामुळे झाला की कोरोनामुळे झाला आहे हे तपासले जात आहे.
Q. ‘सारी’ कोरोनामुळे झाला असेल तर काय ?

A. कोरोनामुळे ‘सारी’ झाला तर त्याला कंट्रोल करणे अवघड जाते. आराेग्य यंत्रणा सतर्क आहे. सर्व खासगी रुग्णालयांनाही कळवले आहे. त्यांच्याकडे सारीचे रुग्ण आढळल्यास मनपाला कळवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
Q. 'सारी' च्या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी कुठे पाठवले जातात?

A. घशाच्या स्वाॅब चे नमुने पुण्याच्या एनआयबी लॅबला पाठवण्यात येत आहेत. रुग्णाला हा व्हायरस बॅक्टेरियामुळे झाला की कोरोनामुळे याचा अहवाल मागवला आहे.
Q. औरंगाबादकर सोबत राज्यातील इतर भागातील लोकांनी काय काळजी घ्यावी?

A. सगळ्यानी लॉकडाऊन व सरकारी नियमांचे पालन करावे. लोकांनी घरातच राहिले पाहिजे. होम क्वॉरंटाइन करणे गरजेचे आहे. एखादी वस्तू आणण्यासाठी बाहेर पडू नए.
‘सारी’ जर काेरोनामुळे झाला असेल तर त्याचा वेग जास्त असताेे. सारी रोग नसून लक्षणाला दिलेले नाव आहे. ताे कुठल्याही बॅक्टेरिया व्हायरसमुळे होऊ शकतो. मृत रुग्णाला काेराेनामुळे ‘सारी’ची लागण झाली असेल तर त्याच्या संपर्कातील लोकांचे विलगीकरण करुन त्यांना होम क्वॉरंटाइनही करावे लागेल.
Clinical managment ने सारी रोगा बद्दल Guideline जारी केली असून ती http://ncds.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कृपया काळजी घ्या, घरीच रहा,
सुरक्षित रहा. 🙏
You can follow @Shine_Dat.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: