1/ गावात बाबासाहेबांचा पुतळा घरा समोरचं. रांजणापासून कासराभर अंतरावर, अंगणातचं. त्यामुळं अगदी लहान वयापासून तिथली भीम जयंतीची लगबग, गाणी म्हणणारं महिला मंडळ, पिंपळावरच्या भोंग्यातून वाजणारी वामनदादाची गाणी, पांढऱ्या स्वच्छ कपड्यात वावरणारा माझा समूह हे सगळं पाहतचं मी वाढलोय.
2/ ज्या वयात कळत नव्हतं तेंव्हा देखील मी तितक्याच उत्साहानं त्यात सामील होत होतो. सगळी कामं करायचो. आता, वय तेवीस मध्ये पण तोच भाबडा उत्साह आहे. पण त्या अनोख्या सोहळ्याकडं बघायचा दृष्टिकोन बदललाय.
3/ गावकुसातल्या मानवी समूहचं, एका शोषित समूहाचं असं एकत्र येणं, त्यांचा स्पर्श, ह्यातलं इसेन्स आणी ह्युमन कनेक्शन जाणवतं राहतं आता.
4/ वस्तीतली एखादी आज्जी जेंव्हा आपल्या अवीट गोड आवाजात,& #39; काय सांगू बाई मवा भीम जवा बोले गं, सूटबूट कोट घालून लोकांमधी& #39; हे गाणं गाते ना तेंव्हा आपसूक पुतळ्याकडं पाहत डोळे पाणावतात. साला, आपलं संबंध आयुष्य जातीयवादी गावगाड्यात सर्व्हायव करणारी ही आयुष्य.
5/ जिथं महारा-मांगाचं कुणी इस्त्री केलेला शर्ट घातला तरी लोकांच्या नजरेत खुपत, तिथंचं बाबासाहेबांच्या सुटाबूटाकोटातलं बेदकर रुबाब जाणवू शकतं. ह्या पुतळ्याजवळच माझं आख्खं बालपण गेलं. इथल्याच मातीत खेळत. इथंच रांगत. भीमगीतं ऐकत. बाराखडी, मुळाक्षरं गिरवत.
6/ थोरा मोठ्याकडं पाहतं इथंच जयभीम म्हणायला शिकलो. वस्तीवर जेंव्हा जेंव्हा जातीय द्वेषातून हल्ले व्हायचे तेंव्हा इथंच रातभर वस्तीचं सरंक्षण करायला पँथर सारखं उभे राहिलोत. पुतळा मागे असायचा. ठामपणे. तोच आधार. तोच मुक्तीदात. त्या शिवाय दुसरा कोणता आधार आहे आपल्याकडं? माय बाप.
7/ सुरुवात शेवट. सगळं तोच. तिथंच जमा होणारं महिलामंडळ. रातभर चालणारी गाणी. सांच्याला मायमाऊली डोळं मिटून सूर लावायची,& #39; भिमाईच्या वासराचा...रामजीच्या लेकराचा...पाय गुणा असा भारी... जागा केला..& #39; किंवा & #39;अन्यायाची सुरी धरी माणूस माणसावरी..असली दादागिरी पाहूनी भीम चेतला उरी...& #39;…
8/ …खरंतर हे इतकं अफलातून आणी नितळ आहे ना की हा अनुभव मला शब्दात कधीच सांगत येणार नाही. समूह भावना, स्पर्श, आपलेपण, संघर्ष ह्या सगळ्याच मिश्नण तिथं तयार होतं. इथून पुढं ना गावगाड्याची भीती असायची. ना कसल्या उन्मत्त झुंडीचा दबाव. असो. यंदाची आपली ऑनलाइन जयंती आहे.
9/ सगळीकडं दादा, ताई, कार्यकर्ते लाईव येऊन गाणी, कविता वैगरे चालल्यात. त्यामुळ खूप बरं वाटलं. म्हणलं आपण ही व्यक्त व्हावं. घरातचं बसा. बाहेर जाणं टाळा. काळजी घ्या. आजूबाजूच्या लोकांची. आपल्या वस्त्यांची! अडीअडचण, अडलं-नडलं पाहुयात. मदत लागली तर बिनधास्त एकमेकांना विचारा.
10/ ब्रदरहुड इथंच कामाला येतं. कारण ह्या पॅन्डॅमीक मध्ये सर्वात व्हर्नरेबल आपला गावकुसात, शहरांच्या घेटोत राहनारा समूह आहे. वयक्तिक पातळीवर एवढंच करू. जातील हे पण दिवस! जय भीम! :)
#भीमजयंती
#भीमजयंती