बाई च्या जन्माचा आधीच उल्हास त्यात जन्म झाल्यावर अवहेलना पाठिशीच, घरात मिळणारा दुय्यम दर्जा आणि समाजात नसणारी काडीचीही किंमत
रांधा, वाढा, उष्टी काढा चा तगादा, पाळी आली की एखाद्या थोडाराशी बांधलेली गाठ
न कळलेलं बाईपण तोवरच सैरभैर करणारं मातृत्व
उंबरठ्याची चौकट आणि आयुष्याला लागलेली खुट्टी
भारतीय स्त्रीच्या या दळभद्री आयुष्याच्या गणिताची उकल करणारा "जोतिबा"
"द्रष्टा पुरुषा" ची व्याख्या सांगायची म्हणलं तर डोळ्यापुढे आधी तुझं नाव येतं
स्त्री शिकली पाहिजे, घडली पाहिजे तरच तीच कुटुंब आणि पर्यायाने समाज घडेल हा गर्भितार्थ तुला कळला
फक्त धडे देऊन नाही तर त्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून करून तू समाजासमोर आदर्श ठेवलास.
प्रत्येक पुरुषाला तुझ्यासारखा "जोडीदार" बनता यावं. कितीतरी मागे
असलेल्या सहचारिणला स्वतः कष्ट घेऊन स्वतः सोबत घेऊन चालता यायला हवं. तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देऊन तिचा परीघ मोठा करायला हातभार लावता यायला हवं. ती खऱ्या अर्थाने आपली "सहचारिणी" असते हे सिद्ध करता यायला हवं.

स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, दत्तककिकरण, कुमारी माता,
अस्पृशांची हेळसांड ह्या आणि अनेक प्रश्नांवर तू आणि तुझ्या सहचारिणी ने आयुष्य वेचल
तू माझ्यासाठी वेचलेलं तुझं आयुष्य कायम समरणात असेल

वाढदिवसाच्या शुभेच्छा तात्या अभिवादन..!
#क्रांतीसुर्य_जोतिबा

This Thread By - @Rajashr72040778
Rajashree Kamble, Pune.
You can follow @PantherTalks.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: