बीजिंग ऑलम्पिक पुरुष जलतरण विभागातील स्पर्धेत पहिली सहा सुवर्ण पदके घेऊन निर्विवाद वर्चस्व मिळवू पाहणाऱ्या मायकल प्लेप्स समोर आव्हान होते ते मिलोरेड कॅविकचे टॉप टायमिंग देऊन पात्र ठरलेला हा सर्बियाचा खेळाडू.Butterfly प्रकारात सर्वकृष्ठ विश्लेषक सुद्धा त्याच्या बाजूने
Butterfly 100 मीटर लढत सुरू कॅविक ची उत्तम सुरुवात पहिल्या 50 मीटर मध्ये तो 1st position वर तर प्लेप्स सातव्या.पुढचे 50 मी प्लेप्स साठी खुप महत्त्वाचे जर जिंकला तर Mark Spitz च्या सर्वाधिक सात सुवर्ण पदक जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी करून पुढे
आठ सुवर्णपदक जिकून नवीन विश्वविक्रम करण्याची संधी.!इथे प्लेप्स ने शेवटच्या केवळ 15 सेकंदात आपल्या खेळाचा उत्तम नमुना दाखवत ही लढत फक्त 0.01सेकंदाने जिंकली..!एका नव्या विक्रमाशी बरोबरी केली.अवघ्या वयाच्या 15 व्या वर्षी मायकल प्लेप्स ला सिडनी ऑलिम्पिक मध्ये पात्र ठरून
पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.सिडनी मधील कामगिरीवर बोलतांना तो म्हणतो की मी पाचव्या स्थानावर असणे सुद्धा मोठं यश आहे.पुढे 2004 च्या अथेन्स ऑलिम्पिक मध्ये त्यानं खरी आपल्या Swimming करियरला सुरवात केली.
अथेन्स मध्ये सहा सुवर्ण आणि दोन कांस्य पदक जिंकले. तर 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिक मध्ये सर्वच्या सर्व 8 सुवर्णपदक जिंकून विश्वविक्रम स्थापिक केला.आता खरी त्याची जगभरात चर्चा सुरू झाली खूप सारे ब्रँड,पैसा येन सुरू झालं. प्लेप्स हे क्रीडा क्षेत्रातील अग्रगण्य नाव झालं.
प्लेप्स वर खुप सारे लिखाण केले जाऊ लागले तर शास्त्रज्ञांनी त्याच्या शरीराच्या ठेवणीवर संशोधन सुरू केले.त्याच विश्लेषण करायचे झालं तर ते म्हणतात की त्याचे शरीर हे एक प्रकारे पोहण्यासाठीच बनले होते. त्याची उंची ही सहा फूट चार इंच तर त्याच्या हाताचा घेराव हा सहा फूट सात इंच म्हणजे
त्याच्या उंची पेक्षा 3 इंच ने जास्त.म्हणजे हात हे पायापेक्षा मोठे त्यामुळे त्याला पोहताना लांब हातामुळे जास्त प्रमाणात अंतर कापणे सोप्प व अरुंद पायामुळे फ्रीकशन कमी होऊन वेगास मदतच. प्लेप्सच्या हाताची असणारी ठेवण ही इतर साधारण माणसापेक्षा जास्त वळण घेऊ शकतो याने त्याला मिळणारा
Butterfly प्रकारात अतिरिक्त फायदा.म्हणजे एक प्रकारचा नैसर्गिकरित्या पूर्ण शरीर पोहण्यासाठीच बनले की काय.!या शास्त्रज्ञांच्या मताने वाद ही निर्माण झाला होता काहींच्या मते म्हणजे तो विशेष कष्ट न घेता सहजच जिंकू शकतो.जास्त दूर जाण्यापेक्षा 2012 च्या लंडन ऑलिम्पिक मधील
त्याचाच साथीदार असणारा टायलार कॅरी म्हणतो की प्लेप्स सारखी शरीरसुष्टीअसती तर मीही अजूनही खूप काही कमावले असते तो जास्त मेहनत घेत नाही.यावर प्लेप्स "मी लंडन ऑलिम्पिक साठी पूर्ण तयार आहे" फक्त एवढंच उत्तर देतो.त्याचे प्रशिक्षक बोमेन मात्र चिडून उत्तर देताना म्हणतात.
"अथेन्स ऑलिम्पिक पूर्वी मायकल सलग 6 वर्षे तयारी करत होता एकही दिवस सुट्टी न घेता.त्या वेळी कोणी पाहत नव्हते एव्हाना दिसत नव्हतं." जे Workout आणि weight training करतात त्यांना माहीत असेल की दिवसातील 7 ते 8 तास सुद्धा किती कष्टाचे असतात मायकलने टायलरचे मत व्यक्तिगत न घेता आपल्या
मुख्य लक्ष्यावर केंद्रित केलं.कोण काय बोलत आहे याचा जास्त विचार केला नाही तो म्हणतो"जेव्हा मी पाण्यात असतो माझा पूर्ण फोकस हा लेण वरच असतो इतर कुठंही नाही.आपण जेव्हा एकच काम किंवा कोणतीही
गोष्ट ही सतत केल्याने त्यात नावीन्य कमी होऊन फोकस कमी होत जातो अशावेळी एकदम Discipline राहणे व आपलं लक्ष्यावर केंद्रित राहूने हीच खऱ्या विजयाची चावी आहे" लंडन 2012 च्या ऑलम्पिक मध्ये त्याने चार सुवर्ण आणि दोन सिल्वर पदके जिंकले.यात कॅरी सुद्धा सोबत होता.
लंडन ऑलिम्पिक नंतर त्याने निवृत्ती स्वीकारली होती. इतके यश मिळाल्यावर आता काही मिळवण्यासारखं बाकी नाही असे त्याचं त्यावेळी मत. खुप मोठी प्रतिष्ठा,पैसा आला जीवन आता ऐश आरामात सुरू झालं.बेपर्वा गाडी चालवली म्हणून मध्ये 2500$ दंड एक वर्षांची शिक्षाही त्याला भोगावी लागली.जगभरात हिरो
ठरलेला मायकल मात्र अमेरिकेतील लोकांच्या नजरेत वाईट भासू लागला. त्यालाही हळूहळू याची जाणीव झाली एवढे नाव कमवून इतक्या कमी कालावधीत नजरेतून उतरू शकतो..!यावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला असता समजले की पुन्हा ती किर्ती मिळवायची असेल तर रिओ मध्ये उतरावं लागेल. केवळ दोन वर्षात
Qualify करून रिओ ऑलिम्पिक गाठले.पुन्हा एकदा नव्याने सुरवात वाया गेलेल्या दोन वर्षे,वाढणारे वय,मोठ्या अपेक्षाचं ओझं घेऊन पाण्यात उतरला आणि तिथेही निराश न करता पूर्वीसारखा सर्वोत्तम खेळ करून 5 सुवर्ण आणि एक रोप्य पदक जिंकूनच बाहेर आला.बाहेर आला तो कायमचाच निवृत्ती घेऊनच..!
रिओ मध्ये सुद्धा 100 मीटर Butterfly मधील लढत ही खूप चुरशीची झाली.यावेळी मायकल समोर आव्हान होते ते त्याचा चाहता असलेल्या जोसेफ स्कूलिंगचे आपल्याच हिरोला पराभूत करून त्याने सिंगापूरला पाहिले सुवर्ण पदक मिळवून दिले.तुलनेने कमी उंचीच्या स्कूलिंगने कष्टाच्या जोरावर मायकलला ही पराभूत
करू शकतो हे दाखवून दिले.आत्तापर्यंत ऑलिम्पिक मध्ये 23 सुवर्ण,3 रोप्य,2 कांस्य अशी एकूण 28 पदके आहेत. सात वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. मायकलला Most Decorated Olympian सुध्दा म्हणतात.मायकल प्लेप्स जर एक देश म्हणून जरी मानलं तर ऑलम्पिकच्या आत्तापर्यंत इतिहासात त्याच स्थान
हे 23 वे असेल.काहीजण असेही मानतात की ऑलिम्पिक मधील एक सुवर्ण हे नोबेल पुरस्कार विजेता किंवा ऑस्कर विजेता कलाकाराच्या समकक्ष असतो.याच्याकडे तर 23आहेत.ध्येयावर लक्ष केंद्रित करा हेच मायकल प्लेप्स सांगून जातो.
धन्यवाद🙏
©✍️ किरण रासकर.
Comment मध्ये तुमचा आवडता खेळाडू कळवा.!
You can follow @kiranraskar44.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: