पुरोगामी ही शिवी बनण्याआधी
सतीप्रथेतून तुझ्या आयाबहिणींना मुक्त करणारे
राजा राममोहन राँय
हे पुरोगामीच होते।
पुरोगामी ही शिवी बनण्याआधी
तूला नाकारलेलं शिक्षण, स्वतः शेणाचे गोळे झेलून तूला देणारे
जोतिबा आणि सावित्रीबाई

स्वतःच्या संस्थानात वसतिगृह बांधून
तूला फुकट शिक्षण देणारे
छत्रपती शाहू महाराज
पुरोगामीच होते।
स्वतःच्या संस्थानात वसतिगृह बांधून
तूला फुकट शिक्षण देणारे
छत्रपती शाहू महाराज
पुरोगामीच होते।

पुरोगामी ही शिवी बनण्याआधी
स्वतःच्या घरच्यांच्या विरोधाला न जुमानता
समाज सुधारणेसाठी, विधवा पुनर्विवाह
स्री शिक्षणासाठी लढणारे
न्या. रानडे आणि डॉ. भांडारकर
पुरोगामीच होते।
स्वतःच्या घरच्यांच्या विरोधाला न जुमानता
समाज सुधारणेसाठी, विधवा पुनर्विवाह
स्री शिक्षणासाठी लढणारे
न्या. रानडे आणि डॉ. भांडारकर
पुरोगामीच होते।
पुरोगामी ही शिवी बनण्याआधी
१८ - १८ तास उपाशीपोटी अभ्यास करून
तूला तूझ्या हक्काचं संविधान देणारे
बाबासाहेब
पुरोगामीच होते।
१८ - १८ तास उपाशीपोटी अभ्यास करून
तूला तूझ्या हक्काचं संविधान देणारे
बाबासाहेब
पुरोगामीच होते।
टीका करणं, विरोध करणं तूझा हक्कचं आहे।
पण काही पाखंडी माणसांसाठी इतर पाखंडी माणसांना
तू "पुरोगामी" ही शिवी देत असशील
तर हार या सच्च्या पुरोगामी माणसांची नाही;
तर त्यांच्या संघर्षाच्या जीवावर डिग्र्या घेऊन मिरवणाऱ्या
तूझी आहे।
- अनघा नंदाने
पण काही पाखंडी माणसांसाठी इतर पाखंडी माणसांना
तू "पुरोगामी" ही शिवी देत असशील
तर हार या सच्च्या पुरोगामी माणसांची नाही;
तर त्यांच्या संघर्षाच्या जीवावर डिग्र्या घेऊन मिरवणाऱ्या
तूझी आहे।
- अनघा नंदाने