❝सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, काॅंग्रेस आणि हिंदूत्ववाद्यांचा अपप्रचार❞

वयाच्या 24व्या वर्षी सुभाषबाबू राजकारणात आणि स्वातंत्र्यलढ्यात उतरले. त्यांचे गुरू होते बंगालचे त्यावेळचे नेते चित्तरंजन दास. त्यावेळी ते ही काॅंग्रेसमध्येच होते. म्हणून सुभाषबाबूही काॅंग्रेसमध्ये गेले.
सुभाषबाबूंनी गांधीजींविरोधांत बंड करून काॅंग्रेस सोडली अशी थाप हिंदूत्ववादी नेहमी मारतात. पण याचे पुरावे ते देत नाहीत आणि पुरावे देतील ते हिंदूत्ववादी कसले? बोसांना हिंदूत्ववादी ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न ही मंडळी करते.पण त्यांच्या या आर्ग्युमेंट्सला ना काही संदर्भ आहे ना पुरावा
खरंतर सुभाषबाबूंनी काॅंग्रेस कधीही सोडली नाही. १९३९च्या त्रिपुरी काॅंग्रेस अधिवेशनानंतर सुभाषबाबूंनी 'ऑल इंडिया फाॅरवर्ड ब्लाॅक' नावाचा पक्ष स्थापन केला. पण त्यांचा हा पक्ष काँग्रेसांतर्गत स्थापन झालेल्या अनेक पक्षांपैकी एक होता. म्हणजे पुन्हा नेताजी काॅंग्रेसमध्येच.
त्यावेळी काॅंग्रेस म्हणजे फक्त काय पक्ष नव्हता, ती एक विचारधारा होती आणि त्या विचारधारेचे त्यावेळी सगळ्यात मोठे नेते होते गांधींजी. मग सुभाषबाबूंची विचारधारा काय होती? हिंदूत्ववाद्यांकडे याचं उत्तर कधीच नसतं. ते सुभाषबाबूंच्या मुस्लिमांप्रती असलेल्या विचारांवर कधीच बोलत नाहीत
त्याचं झालं असं की १९१६च्या ऑक्टोबर महिन्यात लखनौ करार झाला. या कराराचे मुख्य सुत्रधार होते लोकमान्य टिळक. यात मुसलमानांना विशेष अधिकार दिलेले होते. ते खुद्द टिळकांच्या नेतृत्वाखालीचं दिले गेले होते.
टिळक गेल्यानंतर गांधींजींनी मुस्लिमांना विशेषाधार नाकारले. पुढे जाऊन बंगालच्या चित्तरंजन दासांना आणि सुभाषबाबूंना हे अधिकारही कमी वाटले. म्हणून त्यांनी मुस्लिमांना अजून अधिकार देऊ केले आणि 'दास करार' आणला. हा करार लखनौ कराराच्या पुढे जाणारा होता. गांधीजींना हा करारही हाणून पाडला.
सांगायचा मुद्दा हा कि 'मुसलमानांना विशेषाधिकार देणारा लखनौ करार करणारे टिळक हिंदूत्ववादी, दास करार करणारे दास आणि सुभाषबाबूही हिंदूत्ववादी आणि हे दोन्ही करार हाणून पाडणारे गांधी मुसलमानांच लांगूलचालन करणारे' कसे ठरतात? हिंदुत्ववाद्यांकडे याचं धड उत्तर कधीच नसतं.
सुभाषबाबूंनी फॉरवर्ड ब्लॉकमध्ये राहून नेमकं काय केलं ? 'फॉरवर्ड ब्लॉक' ह्या शब्दाचा अर्थ 'काँग्रेसींनो चळवळ करण्यासाठी पुढे या' असा होता. १९४०साली सुभाषबाबू जीना व सावरकर ह्यांना भेटले; पण दोघांना ते 'काँग्रेसचे नेते' ह्या नात्यानेच भेटले.
त्यानंतर ते अफगाणिस्तान, रशियामार्गे जर्मनीला गेले. नंतर जपानला आले. त्यांनी मलाया येथे २१ ऑक्टोबर १९४३ ला स्वतंत्र भारताचे हंगामी सरकार कायम केले. हंगामी सरकारचे राष्ट्राध्यक्ष ते स्वतः होते आणि अध्यक्ष म्हणून त्यांची भूमिका ही शुद्ध काॅंग्रेस नेत्याची होती.
"आपल्या प्रतिसरकारचा, ध्वज काँग्रेसचा चरखांकित तिरंगा ध्वज हाच राहील. कारण त्या ध्वजालाच आम्ही भारताचा राष्ट्रध्वज मानतो. आमचे प्रतिसरकार भारतीय जनतेचा एकमेव प्रतिनिधीपक्ष काँग्रेसलाच मानते.
एकदा सुभाषबाबू एका गांधी जयंतीला प्रतिसरकारच्या ताब्यातील प्रदेशात व्याख्यान देताना म्हणाले, "आम्ही गांधीजींना नव्या भारताचे राष्ट्रपिता मानतो.'' त्या प्रदेशात राष्ट्रपित्याची जयंती हा अधिकृत कार्यक्रम होता ! सुभाषबाबूंनी आपल्या सैनिकांना शेवटचा संदेश दिला होता.
आणि तो संदेश होता 'भारतात जाऊन काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारून देशसेवा करण्याचा.' सुभाषचंद्रांचा गांधीजींना विरोध हा काही अहिंसेच्या मुद्यावर नव्हता. गांधींनी अहिंसा सोडावी, अशी कुणाची मागणी नव्हती. नेताजींची मागणी काँग्रेसने चळवळ सुरू करावी ही होती.
नेताजींचा मुद्दा 'गप्प बसू नका, चळवळ करा' हा होता. १९४२ साली काँग्रेसने 'चले जाव चळवळ' सुरू केल्यानंतर मतभेदाचा हाही मुद्दा राहिलेला नव्हता. आझाद हिंद फौजेच्या युद्धबंद्यांची सुटका हे काँग्रेसचे कर्तव्य होते, ते नंतर काँग्रेसनेच पार पाडले.
जी वकील मंडळी या सैनिकांच्या सुटकेसाठी कोर्टात लढत होती ती काॅंग्रेसचीच होती. ह्या बंद्यांना सोडावे म्हणून जी चळवळ झाली तिचे नेतेही काँग्रेसीच होते. मुळात सुभाषबाबू शेवटपर्यंत कांग्रेसीच होती.
हिंदुत्ववाद्यांकडे स्वतःचे असे ना नेते आहेत ना कर्तृत्व. म्हणून ते दुसऱ्यांचे नेते हायजॅक करण्यात धन्यता मानतात. सरदार पटेल आणि भगतसिंग हे त्या नेत्यांपैकीच एक आहेत. या दोघांबद्दल पुढच्या लेखात.
You can follow @rohan_mutha.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: