#Thread

विषय:-११ मारुती दर्शन

आज हनुमान जयंती,दरवर्षी आपण आपल्या जवळच्या हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आपल्या दिवसाची सुरवात करतो.परंतु या वर्षी आपण तसे करू शकत नाही ! तर घरी बसल्या बसल्या आपण समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या ११ मारुतीचे दर्शन घेऊयात !

#मल्हारवारी
(1/13)
1.शहापूर-
कराड पासून १३ किलोमीटर अंतरावर स्थित शहापूर या गावात रामदासांनी पहिल्या मारुतीची स्थापना केली.
या मारुतीची स्थापना इसवीसन १६४४ साली केली गेली.मूर्तीची उंची साधारण ६ फूट आहे आणि मूर्ती पूर्वाभिमुख(EAST FACING ) आहे.हा मारुती चुन्याचा मारुती म्हणून प्रसिद्ध आहे.
(2/13)
2. मसूर
इसवीसन १६४५ साली समर्थ रामदासांनी मसूर गावात महारुद्र हनुमानाची मूर्ती स्थापन केली.मसूर कराड पासून साधारण १४ किलोमीटर अंतरावर आहे.हा हनुमान ११ मारुतींपैकी सर्वात सुंदर मारुती आहे असे म्हटले जाते.मूर्ती ५ फूट उंच असून पूर्वाभिमुख आहे.
(3/13)
3.चाफळ
सातारा जवळील चाफळ गावात रामदासांनी तिसऱ्या मारुतीची स्थापना इसवीसन १६४८ साली केली.या मारुतीला भीम मारुती पण म्हटलं जातं. मूर्ती ७ फुटी आहे. ह्या मारुतीचे मंदिर हे चाफळ च्या राम मंदिरामागे स्थित आहे.
(4/13)
4.चाफळ
इसवीसन १६४८ सालीच रामदासांनी चौथ्या मारुतीची स्थापना केली.या मारुतीचे नाव दास मारुती.या मारुतीची उंची 6 फूट आहे.आणि हा मारुती नमस्कार मुद्रेत थांबलेला आहे.मूर्ती सुंदर आहे आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे.
(5/13)
5.शिंगणवाडी:
साताऱ्यातील चाफळजवळच शिंगणवाडी टेकडीवर समर्थांनी इसवीसन १६४९ साली या मारुतीची स्थापना केली.याला बाळ मारुती किंवा खादीचा मारुती असेही म्हणतात.मूर्ती ३.५ फूट आहे आणि उत्तराभिमुख(NORTH FACING ) आहे.
(6/13)
6.उंब्रज
सातारा जिल्ह्यातील उंब्रज गावी समर्थ रामदासांनी १६४९ साली या मारुतीची स्थापना केली. चाफळहून रोज स्नानासाठी उंब्रजला रामदास स्वामी जात असत. मंदिराशेजारीच कृष्णा नदीचा काठ आहे. हा मारुती मठातील मारुती म्हणूनही ओळखला जातो. मूर्तीची उंची ६ फूट आहे.
(7/13)
7.माजगाव:
१६४९ साली माजगाव या गावात समर्थ रामदासांनी या मारुतीची स्थापना केली.अत्यंत सुंदर अशी मूर्ती आहे आणि मूर्तीची उंची ६ फूट आहे.हि मूर्ती पक्षचिमाभिमुख(WEST FACING ) आहे,म्हणजेच ती राम मंदिराच्या दिशेकडे बघत आहे असे म्हटले जाते.
(8/13)
8.बाहे-बोरगाव:
सांगली जवळ इस्लामपूर गाव स्थित रामलिंग नावाचे बेट आहे.याच बेटावर १६५१ साली रामदासांनी या मारुतीची स्थापना केली.या बेटावर राम-मंदिर आहे आणि या राम-मंदिराच्या मागेच या मारुतीचे मंदिर आहे.
रामलिंग बेट पाहण्यासारखे आहे.
(9/13)
9.मनपाडळे:
कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा आणि पन्हाळगडजवळील मनपाडळे गावी समर्थांनी मारुतीची स्थापना केली आहे.मूर्तीची स्थापना १६५१ साली केली.मूर्तीची उंची ५.२५ फूट असून उत्तराभिमुख आहे.
(10/13)
10.पारगाव:
कराड कोल्हापूर रस्त्यावरील वाठार गावापासून पारगावमध्ये समर्थांनी मारुतीची स्थापना केली.१६५१ साली या मूर्तीची स्थापना झाली आणि हि मूर्ती ११ मारुतींपैकी सर्वात लहान मूर्ती आहे.ह्या मूर्तीची उंची १.५ आहे.
(11/13)
11.शिराळे
सांगलीतील सापांसाठी प्रसिद्ध असलेल्या शिराळे गावी समर्थांनी १६५४ साली या मूर्तीची स्थापना केली.मूर्ती ७ फूट असून उत्तराभिमुख आहे.सूर्योदय आणि सूर्यास्तावेळीस ह्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात.
(12/13)
अश्या रीती आपण ११ मारुतीचं virtual प्रवास इथेच थांबवूयात ! म्हणा,जय श्री राम, जय हनुमान ! जय जय रघुवीर समर्थ.
थ्रेड कसा वाटलं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा,
आवडल्यास RT करा,अधिक माहिती काही सांगायची असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाका !
धन्यवाद !
#मल्हारवारी
(13/13)
@threadreaderapp please unroll.
You can follow @malhar_pandey.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: