राष्ट्रवादीच्या गुंडांनी म्हणे तबलीघी लोकांच्या घाणरेड्या कारनाम्यांवर पोस्ट लिहिणाऱ्यांवर पोलीस केस करण्याचं ठरवलं आहे. त्यात आम्हा काही मित्रांना टार्गेट करण्याच्या चर्चा होताहेत. कालच कळालं.

यावरून एक जुना प्रसंग आणि त्यावरून तेव्हा मनात आलेले विचार आठवले. +
सप्टेंबर २०१८ ची गोष्ट. तेव्हाचीच पोस्ट :

===

काल रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान तीन फोन येऊन गेले. दीड दोन हजार लोकांची झुंड तुमच्या फेसबुक प्रोफाईलला "रिपोर्ट" करण्याच्या तयारीत आहेत हे सांगायला. "काळजी घ्या" म्हणाले तिघे पण.

तेव्हापासून विचार करतोय. +
आपण असं काय केलंय नेमकं की लोकांनी खुन्नस धरून "रिपोर्ट करा रे ह्याला" म्हणावं?

कधी शिवीगाळ केली नाही. आईबहीण काढली नाही. असंबद्ध ट्रोलिंग केली नाही. मग ह्यांना नेमकं खटकत काय असावं? +
मागे एका "वरिष्ठ पत्रकार / विचारवंतांनी" फेसबुकवर उघड पोस्ट टाकली होती.

"ओंकार दाभाडकरने माझ्यापासून वाचवून रहावं" ह्या अर्थाची सुप्त धमकी देणारी. कारण आदल्या दिवशी कोणत्यातरी विषयावर चिवटपणे वाद घातला होता त्यांच्या वॉलवर. वादच घातला होता. ट्रोलिंग नव्हे. विषयाला धरून, +
कोणताही हेत्वारोप नं करता, फक्त वाद घातला होता.

म्हणून ह्यांच्यापासून "बचके रहना" पडेगा. असं हेच म्हणतात. उघडपणे.

आणि ह्यांचे लोकशाहीवादी साधनशुचितेचा मक्ता घेतलेले समर्थक त्या पोस्टवर माझ्या नावावरून, व्यवसायावरून, माझ्या गाव - जात - धर्म सगळ्यावरून शेलक्या टिपण्या मारतात. +
कालच्या त्या हजार दीड हजारांच्या ग्रुपमध्ये हे सर पण होते. "ही नावं महत्वाची आहेत" म्हणताहेत तिथे.

आज हा विषय फेसबुक प्रोफाईल रिपोर्ट करण्याचा आहे. उद्या कुठे जाणार माहिती नाही. हे लोक कुठपर्यंत डूख धरून बसणार माहिती नाही.

त्यामुळे - +
आपण कुठवर जाऊ शकतो? - हा विचार करतोय काल पासून.

आमच्या जालन्यात वर्षातून एकदा पुस्तक प्रदर्शन भरायचं. दर्जेदार पुस्तकांचा दुष्काळच. पण ब्रिगेडी चोपड्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. तळवलकर हे नाव तळवलकर गेल्यावर कळालं. खेडेकर माहिती होते.

हीच दुनियेची रीत. +
दांडगाई करणाऱ्यांच्या झुंडी थेट घुसतात. सज्जनांच्या झुंडी बनत नाहीत. आणि मग असे एकेकटे गाठून टिपले जातात. दाभोलकरांचे मारेकरी त्याच वृत्तीचे अंतिम एक्स्टेन्शन.

इथे आपण फेसबुकवर "आय एम विद यू" म्हणतो. इनबॉक्स, व्हाट्सअप, झालंच तर फोन करून चौकशी, समर्थन, आधार देतो. +
फेसबुक प्रोफाईल ब्लॉक होणं क्षुल्लक आहे. त्या निमित्ताने उभा रहाणारा सिम्बॉलिक प्रश्न फार मोठा आहे.

ऐनवेळी मदतीची, धावाधाव करण्याची गरज भासली तर आपण एकमेकांसाठी धावून जाऊ का?

अशी सज्जनांची झुंड (हो झुंडच. गुंडांना सामोरं जाण्यासाठी झुंडच लागते.) तयार करू शकू का? +
विचारात पडलोय. उत्तर ठाऊक नाही.

===

आमचं फेसबुकवरचं युद्ध १००% वैचारिक असतं. मुद्द्यांवरचं असतं. तेही थेट कुणा लोकांना वैयक्तिक टार्गेट करणारं अजिबात नसतं. तरी ही वेळ येणार असेल - तर अशी सज्जनांची झुंड तयार असणं खरंतर अत्यंत आवश्यक आहे. परंतु ते घडत नाही! +
वरील पोस्टमध्ये मांडलेली गोष्ट दोन वर्षांपूर्वीची. या अनुभवानंतर आम्ही काही मित्र एकत्र आलो, एकमेकांना मदत करायला लागलो. जमेल तसा आधार देण्यास सुरुवात केली. पण आम्ही सगळेच साधे सरळ मध्यमवर्गीय. इथे फेसबुकवर आईबहिणींवर शिव्या सुरु झाल्या की तिथून काढता पाय घेणारे. +
रस्त्यावरची गुंडगिरी, मारामाऱ्या दूरच्याच गोष्टी.

काल त्या गलिच्छ गुंडांच्या चर्चा वाचायला मिळाल्या...खोटं रेटण्यासाठी किती थराला जाऊ शकतात ते बघितलं. या समोर आपला टिकाव काय लागणार असं वाटून गेलं.

वेळ आलीच, तर या गुंडांच्या दडपशाहीसमोर कसे उभे रहाणार? काय करणार? +
त्यावेळी कोण मदतीस येणार?! काहीच कल्पना नाही.

प्रश्न खूप आहे.

२ वर्षांपूर्वीसुद्धा होते.

उत्तर तेव्हाही नजरेच्या टप्प्यात नव्हते...आज ही नाहीत...

: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
You can follow @OmkarDabhadkar.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: