श्रीमान उध्दवजी ठाकरे, गेले २-३ दिवस मिडीयामध्ये केवळ तुमच्याच नावाची चर्चा सुरु आहे. सगळ्यांकडून तुमच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला जातोय (अगदी देशविरोधी समाज कंटकाकडून देखिल). तुमचा जयजयकार होणे, तुमचे कौतुक होणे याबद्दल आम्हाला वाईट वाटायचे काहीच कारण नाही.
आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचे कौतुक होणे हे कोणाला नाही आवडणार? कारण मुख्यमंत्री हा त्या राज्याचा प्रमुख असतो. जेव्हा मुख्यमंत्र्याचे कौतुक होते तेव्हा पर्यायाने त्या राज्यातील जनतेचाही तो गौरव असतो. आमचा ऊर देखिल अभिमानाने भरुन आला असता जर हे कौतुक, प्रशंसा खरे असते तर.
सर्व प्रसारमाध्यमे अगदी तुमच्या ताटाखालचे मांजर असल्याप्रमाणे बातम्या देत आहेत. भयावह व चिंताजनक परिस्थिती असताना, अपुऱ्या निर्णक्षमतेमुळे परिस्थिती हाताबाहेर गेली असतानासुध्दा तुमचे खोटे कोडकौतुक करवून घेणे सुरु आहे. यात भर म्हणून आजवर जे देशविरोधी व हिंदुत्वविरोधी कारवाया
करण्यात अग्रेसर होते तेही तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तुम्हीही आनंदाने ते स्विकारुन स्वत:ची पाठ थोपटून घेत आहात. हे निश्चितच महाराष्ट्रातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. दुर्दैवाने कोरोनाचा विळखा महाराष्ट्राभोवती आणखी घट्ट होऊ लागला आहे. या बिकट परिस्थितीवर
नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना आपल्या सरकारने केली नसताना, देशभरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या २०% पेक्षा जास्त आहे,देशातील रुग्णसंख्येनुसार मृत्युदर २.५% एवढा आहे तर तोच दर महाराष्ट्रात ५% पेक्षाही जास्त आहे. यासाठी कौतुक होतेय?
मुंबईची परिस्थिती तर फार भयाणक झाली आहे. लाॅकडाऊनचे पालन देखिल सर्वच विभागात यशस्वीपणे होताना दिसत नाही. आपण वारंवार लोकांना घराबाहेर पडू नका असे आवाहन करीत आहात,परंतु त्याचवेळी लोकांना जीवनावश्यक वस्तु,भाजीपाला,औषधे हे घरपोच दिले तर कशाला कोण घराबाहेर पडेल?
प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतोच पण त्याचसोबत पोटाची भूक सुध्दा महत्वाची असते ही साधारण बाब आपण नजरंदाज केलीत. संशयित रुग्ण, बाधित रुग्ण व त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डाॅक्टर्स, नर्सेस यांच्या सुरक्षेबाबत अजूनही काही ठोस उपाययोजना आढळत नाही. केंद्राकडून मिळालेले धान्य हे या गंभीर
परिस्थितीत देखिल तुमच्या लाल फाईलमध्ये भरडले जातेय हे फारच दुर्दैवी आहे. आरोग्य विभाग आपल्या परीने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकारने देखिल राज्याची शेष रक्कम वर्ग केली आहे मग आताही सुविधांची वाणवा का? सगळ्यात जास्त रुग्णसंख्या महाराष्ट्रातच का? या प्रश्नाचं
खरं उत्तर द्याल तुम्ही? तबलिगी जमातीबद्दल जाहीरपणे बोलणे टाळलेत त्यामुळे त्यांचं मनोधैर्य आणखी वाढलं. यामुळेच त्यांनी तबलिगी जमातीबद्दल बातम्या प्रसारीत करणाऱ्या काही चॅनल्सना धमक्या देणे सुरु केले आहे. हाच काय तो सर्व धर्म समभाव? सरकारमधील अनेक मंत्री परस्परविरोधी विधानं करुन
लोकांमध्ये आणखी संभ्रम वाढवत आहेत. संकटाच्या या काळात देखिल विखारी राजकारण सुरु आहे. महाराष्ट्रातल्या रुग्णसंख्येबाबत आपले मंत्री बेजबाबदारपणे सफाई देताना दिसत आहेत. मुंबई,पुणे,नागपूर ही आंतर्राष्ट्रीय विमानतळे असल्याने इथे रुग्ण जास्त वाढले हे तर्कसंगत वाटते का आपणास?
मग दिल्ली, बॅंगलोर, कोलकाता, चेन्नई ही काय हॅलीपॅड आहेत का? त्या राज्यांत का नाही जास्त रुग्ण? असो........ मी तुमचा किंवा तुमच्या सरकारचा विरोधक नाही. ही वेळ टिका व उपदेश करण्याचीही नाही शिवाय तुम्हाला सल्ला देण्याइतपत आम्ही मोठे नाही परंतु एवढे सगळे होत असताना ही खोटी खोटी
स्तुती करवून घेणे बंद करा ही हात जोडून विनंती🙏🏻 याने तुम्हाला तात्पुरते बरे वाटेल पण महाराष्ट्राची मान शरमेने खाली जाईल.तेव्हा, ठोस व प्रभावी उपाययोजना करा,परिस्थिती नियंत्रणात आणा मग अशा आगंतुक कौतुकाची गरज नाही भासणार. लोक शिवतीर्थावर जाहीर सत्कार करतील तुमचा!
जय महाराष्ट्र
You can follow @DrvijaySwami.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: