प्रति,
माननीय मुख्यमंत्री श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे
महोदय,
मी महाराष्ट्र राज्याचा नागरिक या नात्याने आपल्याशी बोलतोय.
कोरोना च भारतात आणि महाराष्ट्र मध्ये आगमन झाल्यानंतर ज्या काही घडामोडी झाल्या त्यावर मला काही प्रश्न पडलेत ते सांगण्यासाठी आजच हे लिखाण.

कोरोना च आगमन झाल आणि राज्य शासनाने काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला लगेचच सुरवात केली ती आरोग्य क्षेत्रात..बऱ्यापैकी प्रगती आणि समाधानकारक काम चालू केलंत आपण.
यानंतर अचानक तुमचं कौतुक करणारे संदेश ट्विटर,फेसबुक,मीडिया आणि मीडियामध्ये काम करणारे पत्रकार यांच्याकडून यायला लागले
यानंतर अचानक तुमचं कौतुक करणारे संदेश ट्विटर,फेसबुक,मीडिया आणि मीडियामध्ये काम करणारे पत्रकार यांच्याकडून यायला लागले
आपण एखाद्या कुटूंबप्रमूखासारखे महाराष्ट्र राज्याची काळजी घेताय..नेता असावा तर आपल्यासारखा वगैरे आशयाचे मेसेज व्हायरल झाले..
यानंतर पंतप्रधानांनी एक दिवसाचा लाक्षणिक जनता कर्फ्यु जाहीर केला.त्याच रात्री आपण लोकल बंद करून तोच कर्फ्यु lockdown म्हणून पुढे वाढवलात.
यानंतर पंतप्रधानांनी एक दिवसाचा लाक्षणिक जनता कर्फ्यु जाहीर केला.त्याच रात्री आपण लोकल बंद करून तोच कर्फ्यु lockdown म्हणून पुढे वाढवलात.
मग सुरवात झाली तुमच्या फेसबुक निवेदनांची.काळजी करू नका,बाहेर जाऊ नका,सोशल डिस्टन्सिंग पाळा...
पण आपल्या प्रत्येक निवेदनात हेच तर असतं
तीच वाक्य फक्त क्रम बदलून बोलता अस वाटत.
अगदी आजपर्यंत तेच चालू आहे.एवढ्या काळात आपल्या सरकारने एकही लोकांना दिलासा देईल अशी योजना आणली नाही.
पण आपल्या प्रत्येक निवेदनात हेच तर असतं
तीच वाक्य फक्त क्रम बदलून बोलता अस वाटत.
अगदी आजपर्यंत तेच चालू आहे.एवढ्या काळात आपल्या सरकारने एकही लोकांना दिलासा देईल अशी योजना आणली नाही.
इतर राज्यांनी आपल्या जनतेला रोख रक्कम आणि धान्य स्वरूपात मदत करायला सुरुवात पण केली तरीही आपण आज उद्या काहीतरी योजना आणणार अस वाटत होतं पण नाही.दिल्ली,उत्तर प्रदेश,केरळ,ओडिशा,या राज्यांनी उत्तम आधार दिला जो लोकांपर्यंत पोहचला सुद्धा.
एवढ्या अवधीत आपल्या राज्य सरकारनं काय केलं?फक्त आवाहन.lockdown मध्ये घ्यावयाची काळजी देणारी निवेदन देण्यापलीकडे आपण स्वतः किंवा आपल्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांनी काही केलं अस मला तरी दिसलं नाही.
सकाळी तुम्ही निर्णय घेणार...दुपारी किंवा संध्याकाळी तो निर्णय बदलला जाणार हेच पाहतोय महाराष्ट्र..आकडे बाकी वाढत चाललेत
केंद्र सरकारने लोकांना वाटायला धान्य पाठवलं..त्याच अजून वितरण करता नाही आलं आपल्या सरकारला.3 महिन्याच एकदम द्यायचं की महिन्याला वाटायचं?यावर अजून एकमत नाही झालं
केंद्र सरकारने लोकांना वाटायला धान्य पाठवलं..त्याच अजून वितरण करता नाही आलं आपल्या सरकारला.3 महिन्याच एकदम द्यायचं की महिन्याला वाटायचं?यावर अजून एकमत नाही झालं
इतर राज्यांनी धान्य लोकांना वाटायला सुरवात पण केली.रोख रक्कम स्वरूपात लोकांच्या अकाउंट ला पैसे पोहचले सुद्धा.
त्यांचे मुख्यमंत्री ग्राउंड लेव्हलवर फिरतायत.परिस्थिती चा आढावा घेतायत.सर्व लोक मीडिया च्या माध्यमातून पाहतायत.
त्यांचे मुख्यमंत्री ग्राउंड लेव्हलवर फिरतायत.परिस्थिती चा आढावा घेतायत.सर्व लोक मीडिया च्या माध्यमातून पाहतायत.
महापालिका आयुक्तनी आदेश काढला कोरोनाबाधित लोकांचे मृतदेह जाळा.2 तासात तो निर्णय मागे घेतला.
आपण कॉमन मिनिमम प्रोग्रॅम वर सरकार बनवलं आहे...पण समन्वय नाही पक्षामध्ये नाहीतर हे असे रोजचे निर्णय बदलले गेले नसते.
आपण कॉमन मिनिमम प्रोग्रॅम वर सरकार बनवलं आहे...पण समन्वय नाही पक्षामध्ये नाहीतर हे असे रोजचे निर्णय बदलले गेले नसते.
महाराष्ट्र मध्ये आता एकच चालू आहे...कोरोनाचे आकडे जसे जसे वाढत जातायत तस तसे तुमच्या कौतुकाचे ट्विट वाढायला लागलेत...कारण मलाच कळलेलं नाही.नेमकं तुम्ही आमची काळजी घेताय अस सगळे म्हणतायत पण आपण केलं काय हा माझा मुख्य प्रश्न आहे???
बर हे ट्विट्स करणारी लोक तीच आहेत जी माझ्या देशाला आणि माझ्या हिंदू धर्माला नाव ठेवताना थकत नाहीत.ती लोक तुमचं अचानक गुणगान गात आहेत?
तुमच्यात अचानक त्यांना एक स्टेट्समन दिसायला लागण हे थोडं संशयास्पद वाटलं मला.

तुमच्यात अचानक त्यांना एक स्टेट्समन दिसायला लागण हे थोडं संशयास्पद वाटलं मला.
कारण,महाराष्ट्र सरकारने एकही योजना आणली नाही...फक्त हॉस्पिटलमध्ये रुग्णांची ट्रीटमेंट चालू आहे.यापलीकडे काहीही काम नाही.पण अशी ट्रीटमेंट तर सगळीच राज्य सरकार करत आहेत.
आपण वेगळं काहीतरी अभूतपूर्व केलं की काय म्हणून माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर काहीच हाती लागलं नाही.
आपण वेगळं काहीतरी अभूतपूर्व केलं की काय म्हणून माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर काहीच हाती लागलं नाही.
आपल्या सरकारने काही कैदी सोडले...त्यातल्या एका कैद्याने एक महिलेचा खून केला...ह्याची जबादारी आपले गृहमंत्री घेतील का?कायद्याचा धाक उरला नाहीय लोकांना.
Lockdown फक्त सामान्य लोकांपुरता आहे.जे फिरायचे ते फिरतायत.रस्त्यावर गर्दी करतायत.
Lockdown फक्त सामान्य लोकांपुरता आहे.जे फिरायचे ते फिरतायत.रस्त्यावर गर्दी करतायत.
नेते पत्रकार परिषद घेतायत पण एकही लोकांना दिलासा देणारं काम होत नाहीय...निव्वळ भाषणबाजी आणि तुमचं प्रतिमा संवर्धन चालू आहे महाराष्ट्रात..
आपणाला प्रतिमासवर्धनाची गरज पडावी हेच आश्चर्य आहे माझ्यासाठी.
आपले वडील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव असताना तुम्ही हे करावं
आपणाला प्रतिमासवर्धनाची गरज पडावी हेच आश्चर्य आहे माझ्यासाठी.
आपले वडील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव असताना तुम्ही हे करावं
हीच कमाल आहे.तुमच्या क्षमतेबद्दल माझ्या मनात काहीच शंका नाही.
पण कुठंतरी समन्वयाचा अभाव आपल्या सरकारमध्ये दिसतोय एवढंच मला एक सामान्य
नागरीक म्हणून वाटत.
जय हिंद
जय महाराष्ट्र
पण कुठंतरी समन्वयाचा अभाव आपल्या सरकारमध्ये दिसतोय एवढंच मला एक सामान्य
नागरीक म्हणून वाटत.
जय हिंद