थ्रेड पुर्ण वाचा.
एक मुलगा आहे ट्विटर वर ज्याने मला खुप आधी follow केलेलं पण मी काल त्यांच बोलणं आवडलं म्हणून त्याला follow back दिला.तर त्याचा मेसेज आला की thank you ताई follow केल्याबद्दल.त्याला म्हटलं अरे त्यात काय...भाई हे तू मेरा.मग ओळखं झाली आणि असं+
समजलं की त्यालापण चेस खेळायला आवडतं म्हणून मी खेळते तो  चेस गेम त्याला सांगितला त्याने तो download केला.वेळ ठरवली आणि आत्ताच आमचा गेम संपला.एकुण 3गेम खेळलो तिन्ही मध्ये त्याने मला हरवलं...खुप भारी चेस खेळतो तो.खुप उत्तम इंग्लिश बोलतो आणि लिहितो सुद्धा.+
जॉब stock market मध्ये technical Analyst आहे असं आत्ताच DM मध्ये समजलं.काहीही ओळख नव्हती पण खेळण्याची आवड होती.सांगितलं त्याला की तू भारी खेळतोस..मग बोलता बोलता विषय निघाला तर तो म्हटला तू पहिलीच मुलगी आहेस जिच्याशी मी बोललो.म्हटलं असं कसं?+
शाळा,कॉलेज,जॉब मध्ये मुली असतातच की एकीसोबतही तू कसं काय बोलला नाही? तर म्हटला आहे एक कारण आता तुला सांगितल तर तू ही बोलणं बंद करशील.मग तर मला कारण जाणुन घ्यायची जास्तच इच्छा झाली.त्याला म्हटलं असं अजिबात होणार नाही तू बिनधास्त रहा पण कारण नक्की सांग.+
बहिण मानलयं तर हक्काने कारण सांग त्यावर त्याचा reply 

"आई म्हणते मी खुप handsome आहे.आणि मलाही ते मान्य आहे पण मला एक डोळा नाही गं..मी एका डोळ्याने अंध आहे.फक्त हे ऐकुन माझ्याशी बोलणं बंद करु नको."

यांवर मी उडालेच काय बोलावं कळेना मला आणि डोळे नकळत ओले+
झाले.मग 2मिनिट थांबून त्याला reply दिला.

"तुझ्याशी बोलणं मी कधीही बंद करणार नाही आणि ज्यांनी फक्त तुझ्यातलं व्यंग पाहुन तुझ्याशी बोलणं बंद केलं ते डोक्याने अपंग आहेत तू मात्र त्यांच्यापेक्षा खुप सक्षम आणि हुशार मुलगा आहेस.स्वत:ला कधीही कमी समजू नकोस प्लिज.
आणि कधी काही गरज लागली तर हक्काने सांग तुझी बहिण आहे मी कधीही मदत करेल."

आणि ट्विटर ने मला एक खुप छान,प्रेमळ आणि प्रचंड हुशार भाऊ दिलाय.https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="♥️" title="Heart suit" aria-label="Emoji: Heart suit">https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="😍" title="Smiling face with heart-shaped eyes" aria-label="Emoji: Smiling face with heart-shaped eyes">

धन्यवाद.https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🙏" title="Folded hands" aria-label="Emoji: Folded hands">https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🙏" title="Folded hands" aria-label="Emoji: Folded hands">
@TwitterIndia
आणि हो हा थ्रेड भावाला sympathy देण्यासाठी नसुन जे बोलणं बंद करुन अशा प्रकारे त्यांच्या मानसिकतेची किव येईल असं वागतात त्यांच्यासाठी आहे.कारण तो sympathy घेणारा नाही तर खुप मोठी "प्रेरणा" देणारा आहे आणि असतातचं!https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="💓" title="Beating heart" aria-label="Emoji: Beating heart">
You can follow @dipaligaikwad07.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: