महाराष्ट्रातील काही मशिदींमध्ये (एका हाताच्या बोटांवर मोजण्याएवढ्या का असेनात) सामूहिक नमाज अदा करण्यात आल्याचा बातम्या येत आहेत. राज्य सरकारच्या गृह विभागाकडे प्रत्येक राज्यातील मशिदींची माहिती असेल, नसेल तर ती महापालिका किंवा तत्सम संस्थांकडूनही मिळू शकेल. 1/n
मशिदीत नमाजचे नेतृत्व करणारे इमाम मंडळींची कुठली संघटना आहे का ते बघावे, नसेल तर देवबंदी आणि बरेलवी असे दोन भाग असतात, त्यांच्या सर्वोच्च संस्थांच्या महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना या इमामांना सामूहिक नमाज पठण थांबविण्याचे पत्रक आदेश काढण्यास सांगावे. शासनानेही तसे आदेश काढावेत 2/n
सोबतच मोहल्ला कमिटीसारखी प्रत्येक परिसरातील काही सुज्ञ मुस्लिमांची (व्हर्च्युअल का होईना) टीम बनवावी (स्थानिक पोलिसांना अशा मुस्लिम सहकाऱ्यांची कल्पना असते) परिसरातील मशिदीत लोक जमा झाले की त्याची माहिती पोलिसांना देण्याचे त्यांना आवाहन करावे, ते आनंदाने करतील. 3/n
सर्वांत महत्त्वाचे, नमाज पठण हे प्रत्येक मुस्लिमासाठी कंपल्सरी आहे, त्यातून (बिचाऱ्यांना) सूट नाही. त्यामुळे दिवसातून पाच वेळा अजान दिली जाते, अजान म्हणजे काय तर नमाजसाठी मशिदीत येण्याचे निमंत्रण ( ही बांग कोरोनाच्या पूर्वीपासून आहे बरं), 4/n
ती अरबीत असली आणि त्याचा अर्थ 99% मुस्लिमांना कळत नसला तरी अजान ऐकू आली की मशिदीत नमाजला जायचे असा शिरस्ता ठरलेला असतो काहींचा (बहुसंख्य मुस्लिम 90% हुन अधिक एक किंवा अधिक वेळची नमाज पढत नाहीत, काही जुम्मा तर काही रमजान, शब्बे बारात, शब्बे मेराज). 5/n
तर पोलीस आणि प्रशासनाने लाऊडस्पिकरवरून अजान देण्यास काही महिन्यांसाठी बंदी आणावी. (कायमची आणली तर स्वागतच आहे, पण सध्या विशिष्ट कालावधीसाठी आणावी). सामुदायिक नमाज रोखायची असेल तर हे सर्वांत आधी करायला हवे. 6/n
येत्या महिनाभरात मुस्लिमांचे काही महत्वाचे सण येणार आहेत, (जनता कर्फ्युच्या दिवशी शब्बे मेराज होती, इथल्या मशिदींची नमाज थांबवता थांबवता नाकी नऊ आले होते.) 7/n
येत्या आठवड्यात शबे बारात आहे, 25 एप्रिलच्या आसपास रमजानचा महिना सुरू होणार आहे. काही झालं तरी मुस्लिम व्यक्ती रमजानची नमाज चुकवत नाही. त्यामुळे येता काळ महत्वाचा आहे.
8/n
सामान्य मुस्लिमांच्या सद्सद्विवेकावर पोलीस आणि प्रशासनाने अवलंबून राहू नये, त्यांचे ह्रदयपरिवर्तन करण्याच्या फंद्यात सध्यातरी पडू नये. सगळं स्थिरस्थावर झालं की माध्यमांपासून ते आयटीसेल पर्यंत, मुस्लिमांचे राक्षसिकरण करणाऱ्यांचा आपण कायदेशीर इलाज करू. 9/n
बहुसंख्य समाज गेल्या काही दिवसांपासून हताश, हतबल झालाय, मुस्लिमांविषयी असलेल्या अज्ञानाची जागा भीतीने आणि नंतर द्वेषाने घेतली आहे... ही प्रोसेस अनेक दशकांपासून सुरू असली तरी कोरोनाने उत्प्रेरकाचे काम केले आहे. 10/n
यांपैकी अनेक जण मुस्लिमांचा द्वेष करत नाहीत, पण परिस्थितीमुळे आणि दिवसातून पन्नासवेळा येऊन थडकणाऱ्या बातम्यांनी ते सैरभर झालेत (ANI वृत्तसंस्थेने गेल्या 48 तासांत मुस्लिम, तब्लिग, मर्कज या संबंधीच्या 150 हुन अधिक बातम्या दिल्या आहेत.), तर या बहुसंख्याकांची अडचण समजून घेऊ या. 11/n
सुज्ञ मुस्लिमांनी निराश, दुःखी न होता प्राण पणाला लावून आपल्या ज्ञातीबांधवांना-इतर मुस्लिमांना- समजवावे, नात्यात मैत्रीत वितुष्ट आले तरी चालेल, पण सध्या हे गरजेचे आहे. 12/n
आपल्या हातून वेळ निघून गेलीये, मुस्लिम समाजातील अनेक जण इतके बेदरकारपणे का वागताहेत याचं धार्मिक, सामाजिक, मानसशास्त्रीय विश्लेषण नक्कीच करूयात, पण सध्या ती वेळ नाही. 13/n
येणारे दिवस मुस्लिमांसाठी सामाजिकदृष्ट्या किती अवघड असणार आहेत याची कल्पना या धर्मभोळयांना नाहीये, ज्यांना ती आहे आणि हे सत्यात उतरू नये असं वाटतंय, त्या मुस्लिमांनी कंबर कसायला हवी आणि प्रशासनाला वर केलेल्या सूचना अमलात आणण्याचा हट्ट धरायला हवा.
14/n
इकबालचा शेर कायम आठवतो.. दुर्दैवाने त्याचा रिलीवन्स काही संपत नाही,
ये शहादत गाह ए राह ए उल्फ़त में कदम रखना है
लोग आसान समझते है मुसलमान होना

~ समीर शेख

#MusingOfAMuslim 15/15
You can follow @sameer7989.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: