" मच्या तुला अजून एक सांगतो, कबालीचा शूट चाललेला होता. एक महत्वाचा सिन त्या दिवशी शूट करायचा होता. ठरल्याप्रमाणे, सर्व कलाकार आपआपली स्क्रिप्ट वाचत होतो. रजनीकांत पण तेवढ्यात सेटवर आलेला, पा. रंजित अण्णाने त्याला स्क्रिप्ट दिली
आणी तोच अजरामर 'नीलम एंगल उरीमइ...आंबेडकर कोट' हा डायलॉग त्यात होता. आता सुपरस्टार राजनिकांतला पूर्ण कल्पना होती की रंजित आंबेडकरीझमच्या बाबतीत किती रॅडीकल आहे ते. तरीही रजनीकांत तो डायलॉग पाहून दोन मिनिटं थांबला.
स्क्रिप्टकडं एक कटाक्ष टाकला आणी मग म्हणाला, 'ओके डा, अँम रेडी' रंजितसह सगळी टीम प्रचंड खुश झाली. सिन शूट झाला. राजनीकांतने आपल्या चपखल संवाद कौशल्याने 'सूटबूटकोट घालणं सुद्धा व्यवस्थेविरोधात एक बंड होतं म्हणूनचं आंबेडकर कोट घालायचे' हा संवाद कॅमेराबद्ध केला.
किती वर्षे वाट पाहिली होती इथल्या शोषितांनी की मेन्स्ट्रीम मध्ये, एका मास कमर्शियल फिल्म मध्ये आंबेडकरी नायक असावा म्हणून. एक बेदकार नायक. कबाली हा त्याचंचं एक भव्यदिव्य प्रोडक्ट होतं.
सगळ्या टीमचा उत्साह ओसंडून वाहत होता. ह्यावेळी कुणापुढं न झुकणारा, कुण्यातरी सेव्व्हियरची वाट न पाहणारा, सुटबुटाकोटात आपल्या समूहाच्या लढ्यासाठी 'नेरूपुडा' ची गगनभेदी गर्जना करत एक नायक येत होता.हे स्वप्न तिथं साकार होत होतं. ते पण रजनीकांत सारख्या मास अभिनेत्याच्या रूपात.
रंजित अण्णाच्या डोळ्यात पानी आलं. मोबाईलवरचा बाबासाहेबांचा फोटो पाहत त्याने तडक रेस्टरूम गाठली. आन दरवाजा बंद करून कितीतरी वेळ तो जोरजोरात रडत होता. सगळ्या टीमने आवंढा गिळला. तोंडावर तेच जयभीम आलं, आणी सगळी जण रडायला लागली.
प्रत्येकाच्या डोळ्यात आसू होते त्या दिवशी. आपण करून दाखवलं म्हणून. आपल्या बापाचं पावरफुल स्टेटमेंट आपण इतक्या मोठ्या सिनेरूपानं मांडतोय म्हणून. उद्या करोडो लोकं मोठ्या पडद्यावर, हा डायलॉग ऐकतील म्हणून. त्या वेळी सगळीच जण प्रचंड इमोशन होती.
आजही रंजित अण्णां जेंव्हा ऑफिसला आल्यावर बाबासाहेबांच्या फोटोकडं पाहतो, मला तोच शूटिंग दरम्यानचाचं सिन आठवतो. साला अजब रसायन आहे यार हे. हा गडी आंबेडकरी चळवळीतीला हिरा आहे.'
मागे रंजितच्या टीम मधल्या एकाशी बोलतानाचा हा संवाद. त्याच्याच तोंडून ऐकलेला. तो थोडावेळ थांबुन नंतर निघून गेला. मी कितीतरी वेळ विचार करत तिथंच वेलंचेरीच्या खाडी किनाऱ्यावर बसलो. साला रंजित महाराष्ट्रात पोहचला पाहिजेत हेच मनात होतं.
नंतर काही दिवसांनी प्रशांत सरांनी फोनवर विचारलं, सिनेमातली दलित आयडेंटिटी ह्यावर दिव्य मराठीच्या दिवाळी अंकासाठी लिहशील का म्हणून. मला थोडं दडपण आलं, कारण मेन्स्ट्रीम मध्ये असं काहीतरी 'सिरियस' लिहण्याचा कसलाच अनुभव नव्हता. तसं मी त्यांना बोलून पण दाखवलं.
त्यांनी मात्र तुला जसं जमले तसं लिही, हा फार महत्वाचा विषय आहे, मराठीत आला पाहिजेत म्हणत विश्वास दिला. मग ऑफिस सांभाळत विकेंडचा वेळ काढून वडं चेन्नईत चक्करा मारून, बऱ्याच नवीन लोकांशी भेटून बोलून तमिळ सिनेमातली सामाजिक स्थित्यंतरं आणी त्यातली दलित आयडेंटिटी ह्याचा लेख उभं राहिला.
तो दिव्य मराठीच्या दिवाळी 2019 अंकात छापून आलाय. जमेल तसं रेटलय. मांडायचा प्रयत्न केलाय. खरं तर ह्या विषयावर अजून चिक्कार काम होणं गरजेचं आहे. पेरियारांच्या विद्रोही तमिळ भूमीतल्या सामाजिक सांस्कृतिक चळवळी मराठीत आणण्याचा पुढं देखील प्रयत्न असेलच.
या मागे फक्त, महाराष्ट्रात आंबेडकरी सांस्कृतिक राजकारण अजून वेगळ्या उंचीवर जावं, अनेक फॉर्म मधून ते सातत्याने बाहेर यावं, त्यात नवनवीन निर्मिती व्हावी हीच इच्छा. तूर्तास हा एक लेख. नक्की वाचा. कळवा.
कॉलेजमधून पास होऊन जॉब निमित्ताने, थेट दोन वर्षे काढली चेन्नईत. नाना कांड केले. पण हे एक महत्वाचं काम झालं आपल्याकडून. एवढचं कौतुक. जय भीम! लव. पीस. <3
अजून एक. वेट्रीचा असुरण, हा लेख प्रकाशित झाल्यानंतर रिलीज झाला होता नाहीतर, त्यावर पण लिहायचं होतं. सविस्तर कधीतरी.
You can follow @GunvantSr.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: