#THREAD
१.
किल्ले -राजगड
स्वराज्य म्हटलं कि अनेक किल्ले येतात,स्वराज्याची शपथ घेतलेला रायरेश्वर समोर येतो तर स्वराज्याचे तोरण जिथून चालू झाले असा & #39;तोरणा& #39;आपल्या नजरे समोर येतो ! हे सगळे कितीही महत्वाचे किल्ले असले तर & #39;किल्ले राजगड& #39; याचे स्थान वेगळेच !
(1/19)
#मल्हारवारी

स्वारगेट पासून राजगड गावापर्यंत साधारण ६१ किमी चे अंतर आहे ! स्वारगेट,नर्हे,खेड असे करत गाडी नसरापुरास पोहोचते आणि नसरापूर फाट्यापासून गाडी वळवली कि आपण वेल्ह्याच्या मार्गाला लागतो !
नयनरम्य असा हा रास्ता पाहत पाहत आपण दिडघर,आंबवणे अश्या छोट्या वाड्या आपण पार करून येतो !
(2/19)
नयनरम्य असा हा रास्ता पाहत पाहत आपण दिडघर,आंबवणे अश्या छोट्या वाड्या आपण पार करून येतो !
(2/19)
मार्गासनी फाट्यावरून गाडी डावी कडे वळवून आपण साखर,चिमोडी आणि गुंजवणे ह्या गावात येऊन पोहोचतो ! आणि आपल्या समोर दिसतो तो आकाशात अभिमानाने उभा असलेला & #39;राजगड& #39;.
राजगड साधारण समुद्र पातळी पासून १३७६ मी उंचीवर आहे.तसा चढायला अवघड आहे परंतु ट्रेकर साठी पर्वणी !
(3/19)
राजगड साधारण समुद्र पातळी पासून १३७६ मी उंचीवर आहे.तसा चढायला अवघड आहे परंतु ट्रेकर साठी पर्वणी !
(3/19)
गुंजवण्यात शिरले तर उजवीकडे असलेल्या गुंजण दरवाज्याची वाट लागते.पण हि वाट खूप चढाची आहे.
पाब्यास उतरलो तर आपण कानंदी नदी ओलांडून,खरीव गावांतून,खरीव खिंड चढल्यावर वाजेघरात पोहोचतोइथून उजवी कडच्या वाटेने पाली दरवाजा लागतो तर इथून चढलात तर आपण पद्मावती माचीवर येऊन पोहोचतो !
(4/19)
पाब्यास उतरलो तर आपण कानंदी नदी ओलांडून,खरीव गावांतून,खरीव खिंड चढल्यावर वाजेघरात पोहोचतोइथून उजवी कडच्या वाटेने पाली दरवाजा लागतो तर इथून चढलात तर आपण पद्मावती माचीवर येऊन पोहोचतो !
(4/19)
पदमवती म्हणजे राजगडाची प्रमुख वस्ती ! छत्रपतींचा वाडा,पद्मावती देवींचे देऊळ,तलाव,रामेश्वर,दिवाणघर,अंबारखाना,पागा आणि इत्यादी स्थळे याच माचीवर आहेत ! फोटो काढण्यासाठी सुंदर स्थळं आहेत ! इतिहास जगण्यासाठी तर हि माची अद्वितीय !
(5/19)
(5/19)
थोडे पुढे चालत गेलो कि बालेकिल्ल्याची उभी चढण लागते,कड्यात पस्तीस चाळीस फूट खोबण्या खोदल्या आहेत,त्याच्यात पावले टेकीत वर चढावे लागते,पुढील साधारण ३०० फुटाचा चढाव चढून गेले कि बालेकिल्ल्याच्या नागरखान्याचे महाद्वार लागते.
(6/19)
(6/19)
मग जननीचे देऊळ आणि त्याहीवरी चढले कि चंद्रतळे आणि ब्रम्हेश्वराचे मंदिर! चंद्रतळ्या पासून डावीकडे गेलो तर आपण बालेकिल्ल्याचा मस्तकावर येऊन पोहोचतो,वरती वाडे,अंबारखाना,बाजार पेठ अश्या अनेक वास्तूंचे अवशेष आहेत.
(7/19)
(7/19)
इथेच थोड्या अंतरावर उत्तर बुरुज आहे,तिथून आपल्याला तोरणा,सिंहगड दिसतात बालेकिल्ल्याच्या ऐन टोकावरून
पद्मावती ,संजीवनी आणि सुवेळा या तीनही माच्यांची प्रचण्ड दृश्य समोर दिसते आणि आपण या निसर्गासमोर किती खुजे आहोत याची जाणीव होते
(8/19)
पद्मावती ,संजीवनी आणि सुवेळा या तीनही माच्यांची प्रचण्ड दृश्य समोर दिसते आणि आपण या निसर्गासमोर किती खुजे आहोत याची जाणीव होते
(8/19)
इथून आपल्याला अनेक किल्ल्यांचे दर्शन होते.पुरंदर,विचित्रगड,मकरंदगड,प्रतापगड,कावळ्या किल्ला असा साधारण १०० एक किलोमीटर चा प्रदेश पाहायला मिळतो !
(9/19)
(9/19)
बालेकिल्ल्याच्या उत्तर पश्चिम आणि पूर्व बाजूस तीन बुरुज बांधले आहेत.इथून खाली पहिले कि प्रश्न पडतो !
एवढ्या वर इतक्या साऱ्या इमारतींचे सामान आणलेच कसे असेल ?
(10/19)
एवढ्या वर इतक्या साऱ्या इमारतींचे सामान आणलेच कसे असेल ?
(10/19)
संजीवनी माची कडे जायला इथूनच रास्ता उज्या हाताला मिळतो.अंदाजे ५०० फुटाचा तो छातीवर येणार कडा पाहून पायातले त्राण निघून जातात ! संजीवनी माचीचे तीन टप्पे आहेत,त्या पैकी २ टप्पे पार केल्यावर अळू दरवाजा लागतो! हा गडाचा तिसरा दरवाजा.
(11/19)
(11/19)
.दरवाजा ओलांडला कि आपण माचीच्या टोकाकडे जाऊन लागतो ! थोडे पुढे गेल्यावर दोन्ही बाजूनं दुहेरी बांधकाम असलेली तटबंदी नजरेत भरते.हि तटबंदी माचीच्या टोकापर्यंत बांधली आहे. असे दोनीही टाटांची कथा
(12/19)
(12/19)
दोन्ही तटास मिळून अंदाजे १२ बुरुज आहेत,प्रत्येक बुरुजाच्या बाहेर समांतर अशी संरक्षक भिंत बांधली आहे.
आता इथूनच डावीकडे आपल्याला सुवेळा माची कडे जायला रास्ता मिळतो ! सुवेळा माचीवर गडाचे हवालदार शिळीमकर,तान्हाजी मालुसरे यांचे उधवस्त झालेल्या घरट्याचे अवशेष मिळतात !
(13/19)
आता इथूनच डावीकडे आपल्याला सुवेळा माची कडे जायला रास्ता मिळतो ! सुवेळा माचीवर गडाचे हवालदार शिळीमकर,तान्हाजी मालुसरे यांचे उधवस्त झालेल्या घरट्याचे अवशेष मिळतात !
(13/19)
पुढे थोड्याच अंतरावर मोठ्या पायर्यांचा & #39;झुंजार& #39; बुरुज लागतो !
राजगगडावर अनुभवण्यासाठी अनेक अनेक गोष्टी आहेत !
(14/19)
राजगगडावर अनुभवण्यासाठी अनेक अनेक गोष्टी आहेत !
(14/19)
राजगडाचे पूर्वीचे नाव & #39;मुरुंबदेव& #39;.बालेकिल्ल्यावर असलेले ब्रम्हेश्वराचे मंदिर हि किल्ल्याची मूळ वास्तू.१६४५ साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्यानी या डोंगराची अद्वैत रचना आली !सुमारे २५ वर्ष हा किल्ला स्वराज्याची राजधानी होता
(15/19)
(15/19)
राजगड हा बऱ्याच ऐतहासिक प्रसंगांचा साक्षीदार आहे.राजरामांचा जन्म,सईबाईंचा मृत्यू अश्या कौटुंबिक घटना इथेच घडल्या.
जयसिंगाशी तह,शाहस्तेखानाशी झुंज,आग्र्याहून प्रयाण आणि पुन्हा स्वराज्यात परत येणे अश्या घटनांचा साक्षीदार आहे हा राजगड !
(16/19)
जयसिंगाशी तह,शाहस्तेखानाशी झुंज,आग्र्याहून प्रयाण आणि पुन्हा स्वराज्यात परत येणे अश्या घटनांचा साक्षीदार आहे हा राजगड !
(16/19)
अगदी शांत पणे आपण कडावर बसलो आणि विचार केला तर अंगावर शहरे येतात ! कधीकाळी इथे बसूनच महाराजांनी अनेक मोहिमा आखल्या,मित्रांशी संवाद साधले,जिजाऊंचे पाय इथेच कुठेतरी पडले असावेत !
त्या काळी आपण नव्हतो पण आपली भ्रमंती आणि वाचन हे जणू टाइम machine सारखेच आहे !
(17/19)
त्या काळी आपण नव्हतो पण आपली भ्रमंती आणि वाचन हे जणू टाइम machine सारखेच आहे !
(17/19)
पाहिज त्या वेळी पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला ती घेऊन जाते ! नंतरच्या काळात रायगड जरी राजधानी झाला असला तरी राजगडाचे महत्व अद्वितीय आहे.राजगड हा राजांचा गड नव्हे हा गडांचा राजा आहे !
आपण उद्या जाऊयात महाराजांच्या जन्मस्थळी-किल्ले शिवनेरी वर !
(18/19)
आपण उद्या जाऊयात महाराजांच्या जन्मस्थळी-किल्ले शिवनेरी वर !
(18/19)