#थ्रेड #क्रांतिजागर
कै. प्रमोद मांडे सर यांची पोस्ट

छत्रसाल स्मारक, छत्तरपूर, मध्य प्रदेश.
मरहट्टा का वचन........
छ. शिवाजी महाराज यांच्याकडून प्रेरणा आणि मार्गदर्शन घेवुन छत्रसाल यांनी आपले राज्य मुघलांच्या तावडीतुन सोडवले. महाराजांनी वेळ आल्यास मदतीचे आश्वासन दिले होते.
त्याची आठवण छत्रसाल यांनी ठेवून तशी मदत संकट आल्यामुळे मागितली,ती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर पन्नास वर्षानी. शाहू महाराजांनी थोरले बाजीराव यांना पाठवून त्यांचे संकट दूर केले.
पुढे छत्रसाल अन्तर्धान पावले.(त्यांचा देह मिळाला नाही)
छ्त्रसालाच्या मुलांनी त्यांचे स्मारक बांधायला
घेतले. स्मारकाचा १/३ खर्च बाजीराव पेशव्यांनी देण्याचे मान्य ही केले. दुर्देवाने बाजीरावांचा अकाली मृत्यु झाला. हे स्मारक अपुरेच राहिले. हे स्मारक पाहत असताना लक्ष्मीनारायण शर्मा नावाचा २० एक वर्षाचा मुलगा भेटला. कोठून आलात चौकशी केली. पुणे सांगितल्यावर कळी एकदम खुलली.
`ये तो मरहट्टो राजा शिवाजीका मुल्क है । छत्रसालजी को दिया हुवा बचन उनके वंशजोंने निभाया था । मरहट्टे तो बचन निभाना खूब जानते है ।' हे ऐकल्यावर नसलेली छाती चार इंचानी फुगली. `आप तो पूनाके है । पूना तो पेशवाओं का घर रहा है । बाजीराव पेसवाका अधुरा काम अब आप पूरा करो ना।
आप उनके वंसज हो ना ।' या वाक्याने होता नव्हता तेव्हडा अहंकार गळून पडला. डोळयात चटकन पाणी आले, काय आत्मविश्वास होता त्या मुलाचा.
मनात आल घरी तीन वर्षे झाली बदलता येईना म्हणून फुटलेले बेसिन वापरतोय.
महाराष्ट्राच्या किल्ल्यांची अवस्था.
काय बोलावे ?
कोणता मरहट्टा याची मागणी पुरी करु शकेल ?काही सुचेना. तोंड चुकवून बाहेर आलो.

इथे छत्रसालांची दोन स्मारके आहेत. मूळ स्मारकामधे त्यांच्या वापरातील कपडे, मुकुट, तलवार आदी पहायला मिळतात.दारावरचा दोहा मनाला स्पर्शुन जातो.तो असा.
शिवाजी पीछे हुवा बुन्देला बलवान ।
प्राणनाथका शिष्य यह छत्रसाल महान ।।

हे स्मारक पूर्ण करायची जवाबदारी महाराष्ट्र सरकारने उचलली पाहिजे असे वाटते. सध्याचे मुख्यमंत्री यांनी ती जवाबदारी स्वीकारुन महाराष्ट्राला शब्दातून मुक्त करावे.
You can follow @Hindsagar.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: