#Thread :   #LalBahadurShastri 
भारताच्या इतिहासात असा क्वचितच कोणी नेता असेल ज्याचे राजकीय शत्रू जवळपास नसतील.शास्त्रीजी त्यातलेच एक.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आहेत ज्यावर अभ्यास होऊ शकतो पण मला जे सर्वात आवडते प्रसंग आहेत त्यावर त्यांच्या जयंती निमित्त हा थ्रेड.
(1/21)
                    
                                    
                    भारताच्या इतिहासात असा क्वचितच कोणी नेता असेल ज्याचे राजकीय शत्रू जवळपास नसतील.शास्त्रीजी त्यातलेच एक.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आहेत ज्यावर अभ्यास होऊ शकतो पण मला जे सर्वात आवडते प्रसंग आहेत त्यावर त्यांच्या जयंती निमित्त हा थ्रेड.
(1/21)
                        
                        
                        .मूर्ती लहान पण कीर्ती महान या वाक्प्रचाराला सर्वार्थाने न्याय देणारे व्यक्तिमत्व म्हणजे लाल बहादूर शास्त्री.२ ऑकटोबर १९०४ रोजी मुघलसराई,उत्तर प्रदेश मध्ये जन्माला आलेल्या या & #39;नन्हें& #39; चं जीवन लहानपणापासूनच संघर्षमय.
(2/21)
                    
                                    
                    (2/21)
                        
                        
                        शास्त्रीजी खूप लहान असतानाच त्यांचे वडील गेले, पण त्या नंतर त्यांच्या आईने अर्थात रामदुलारीदेवी यांनी आणि त्यांच्या आजोबानी & #39;हजारी लाल& #39; यांनी लालबहादूर चे संगोपन मोठ्या काळजीने केले.
प्रामाणिकपणा,चिकाटी आणि निर्णयक्षमता हे लालबहादूरचे गुण अगदी लहानपणापासूनच.
(3/21)
                    
                                    
                    प्रामाणिकपणा,चिकाटी आणि निर्णयक्षमता हे लालबहादूरचे गुण अगदी लहानपणापासूनच.
(3/21)
                        
                        
                        शास्त्री हे उत्तम संघटनकर्ते होते,काँग्रेस च्या अनेक निवडणुकांसाठी संपूर्ण देशातून त्यांना बोलावले जायचे.अनेक निवडणूक जिंकत शास्त्रींनी स्वतःच्या कार्यक्षमतेची ओळख सर्वाना करून दिली होती.वशिलेबाजी, ओळख आणि इतर गोष्टींनी प्रेरित असलेल्या लोकांना शांतपणे नदुखावता
(4/21)
                    
                                    
                    (4/21)
                        
                        
                        डावाळण्याची कला शास्त्रींनी अंगिकारली होती.शास्त्रीजी पहिल्यांदा अलाहाबाद दक्षिण मधून उभे राहिले आणि जिंकून आले.तेव्हा ,नेहरू कॅबिनेट मध्ये वाहतूक आणि महामार्ग मंत्रालायचा कार्यभार शास्त्रींच्या खांद्यावर येऊन पडला.
(5/21)
                    
                                    
                    (5/21)
                        
                        
                        थोड्याच काळासाठी जरी त्यांच्याकडे हि जबाबदारी असली तरी आमूलाग्र बदल त्यांनी घडवून आणले.विशाखापट्टणम मध्ये असलेले जहाज निर्माण यार्ड हे शास्त्रींच्या काळातच चालू झाले.या काळात संपूर्ण देशात पोस्ट आणि टेलिग्राफ च्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले होते,
(6/21)
                    
                                    
                    (6/21)
                        
                        
                        संपूर्ण देशातील वाहतूक आणि संपर्क ठप्प झाले होते. अश्या वेळेला हुशारीने,सगळ्यांच्या मागण्यापूर्ण करून,सरकारचा आणि कर्मचाऱ्यांचा फायदा होणारा मार्ग शोधून हा प्रश्न मिटवला आणि पुन्हा वाहतूक चालू केली.
(7/21)
                    
                                    
                    (7/21)
                        
                        
                        येत्या काळात टी टी कृष्णम्माचारी यांनी वित्त मंत्री म्हणून राजीनामा दिला आणि कॅबिनेट बदलले गेले,शास्त्रींना आता वाणिज्य मंत्रालयाचे कार्य सोपवले गेले. नवखे असलेले शास्त्री न डगमगता हे काम करू लागले,दिवसरात्र फाईल,रिपोर्ट चाळत त्यांनी काही काळातच संपूर्ण गोष्टींचा आढावा घेत
(8/21)
                    
                                    
                    (8/21)
                        
                        
                        काय बदल करावे लागतील हे कॅबिनेट समोर प्रस्तुत केले आणि तसे बदल केलेही.
त्यांच्या नेतृत्वाखाली वर्षाला ४०० नव्या कंपन्या स्थापन होत होत्या आणि १४-१५ % लोकांचा रोजगार वाढत होता.
नांगल फर्टीलिझेर फॅक्टरी,हिंदुस्थान मशीन टूल अश्या फॅक्ट्री याच काळात स्थापन करण्यात आल्या.
(9/21)
                    
                                    
                    त्यांच्या नेतृत्वाखाली वर्षाला ४०० नव्या कंपन्या स्थापन होत होत्या आणि १४-१५ % लोकांचा रोजगार वाढत होता.
नांगल फर्टीलिझेर फॅक्टरी,हिंदुस्थान मशीन टूल अश्या फॅक्ट्री याच काळात स्थापन करण्यात आल्या.
(9/21)
                        
                        
                        अनेक विदेशी कंपन्यांनी सुद्धा आता भारतात गुंतवणूक करायला सुरवात केली,पण या सगळ्यात शास्त्रींचा प्रामाणिक पण अनेकांच्या डोळ्यात खुपत होता.
एकही इकडचा तिकडचा पैसे स्वहितासाठी न घेता हा माणूस दिवसरात्र काम करत आहे हे पाहून फुकट बसलेल्या लोकांच्या डोळ्यात शास्त्री खुपत होते,
(10/21)
                    
                                    
                    एकही इकडचा तिकडचा पैसे स्वहितासाठी न घेता हा माणूस दिवसरात्र काम करत आहे हे पाहून फुकट बसलेल्या लोकांच्या डोळ्यात शास्त्री खुपत होते,
(10/21)
                        
                        
                        अनेकांनी त्यांच्या या कार्यपद्धतीबद्दल वरिष्ठ नेत्यांना कळवले देखील,पण त्यांच्या याच प्रामाणिकपणा मुळे वरिष्ठ नेते सुद्धा त्यांना कधीही हात लावू शकले नाहीत. जितका मिळतोय तितक्या पगारात दिवसरात्र देशहिताकरिता झटणारा हा माणूस देशाच्या नेतृत्वासाठी तयार होत होता.
(11/21)
                    
                                    
                    (11/21)
                        
                        
                        शास्त्रींची निर्णय क्षमता हि तत्कालीन कोणत्याही नेत्यांपेक्षा सर्रास होती,पटकन निर्णय घेऊन लोकांना शांत करणे आणि दोघांचाही फायदा होण्याचे मार्ग त्यांनी शोधून काढले,१९६१ साली झालेल्या बंगाल दंगली मध्ये त्यांनी दाखवलेले धैर हे खरंच वाखाणण्याजोगे आहे.
(12/21)
                    
                                    
                    (12/21)
                        
                        
                        नेहरूंच्या मृत्यूनंतर आता प्रधानमंत्री कोण हा प्रश्न सगळ्यांना पडला होता.तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी चर्चा करून संसदेत सगळ्यांसमोर लाल बहादूर यांचे नाव पुढे केले आणि गुलझारीलाल नंदा यांनी त्यावर होकार देऊन शास्त्रीजींनी पुढचा प्रधानमंत्री म्हणून घोषित केले.
(13/21)
                    
                                    
                    (13/21)
                        
                        
                        देशाचा कार्यभार स्वीकारताच त्यांनी त्यांच्या पहिल्या भाषणात, प्रामाणिक पणा आणि चिकाटी या दोन गोष्टींवर भर देत,आपण देशाला मोठ्या उंचीवर नेऊन ठेऊ असे सांगत देशवासियांना आश्वस्त केले.
(14/21)
                    
                                    
                    (14/21)
                        
                        
                        अन्न पुरवठा आणि साठ्यामध्ये जेव्हा आपला देश मागे पडू लागला तेव्हा त्यांनी घेतलेले शेतकरी हिताचे निर्णय आजही अभ्यासाचा विषय आहेत. चीनला भारतावर & #39;बॉसगिरी& #39; करायची सवय लागली होती,त्यांनी एक पाऊल पुढे टाकले कि आपण १० मागे या स्वभावामुळे,चीन आता डोक्यावर बसू लागले होते.
(15/21)
                    
                                    
                    (15/21)
                        
                        
                        पण शास्त्रींनी या गोष्टीला रोख लावली आणि चीनच्या धोरणांवर टीका केली.आणि फक्त टीकाच नाही तर हल्ला देखील केला,ज्या ठिकाणी नेहरू & #39;संयुक्त राष्ट्राला& #39; काय वाटेल आपण चीन वर हल्ला केला तर असा विचार करत मागे येत,त्याच ठिकाणी 
(16/21)
                    
                                    
                    (16/21)
                        
                        
                        & #39;आपल्या देशाची किती हानी होत आहे& #39; असा विचार करत शास्त्रींनी चीनच्या उत्तरानं सडेतोड प्रत्युत्तर दिले.मूर्ती लहान असली तरी निर्णयक्षमता हि हिमालय एवढी होती हे निश्चित.
आयुष्यभर,आपल्या पदाचा कधीही गैरवापर न करणारा हा व्यक्ती,संघर्षमय जीवन जगला,
(17/21)
                    
                                    
                    आयुष्यभर,आपल्या पदाचा कधीही गैरवापर न करणारा हा व्यक्ती,संघर्षमय जीवन जगला,
(17/21)
                        
                        
                        २ वेळा हार्ट अटॅक येऊन सुद्धा हॉस्पिटल मधून काम करत त्यांनी अनेक वेळेला त्यांच्या कामाबद्दल आत्मीयता किती आहे हे दाखवून दिले होते.कधीही पैस्याची हाव नाही,मुलांना आपल्या जोरावर मोठे करण्याची इच्छा नाही, आणि सतत जनहिताचा विचार करणाऱ्या या व्यक्तीचा अंत मात्र दुःखद झाला.
(18/21)
                    
                                    
                    (18/21)
                        
                        
                        पाहायला गेलं तर इतका प्रामाणिक,सरळ,जगन्मित्र,पण शत्रूचा कर्दनकाळ असलेला नेता या देशात कधीही घडला नाही,संसदेत जेव्हा विरोधी पक्ष शास्त्रींच्या विरोधात बोलायचे तेव्हा शांत आवाजात मुद्देसूद प्रत्युत्तर देऊन शास्त्री पुढच्यांना क्षमा मागण्यास भाग पाडायचे.
(19/21)
                    
                                    
                    (19/21)
                        
                        
                        शास्त्रीजींच्या नेतृत्वाखाली या देशाने थोड्याकाळाकरता भरपूर प्रगती पहिली.
काश्मीर मुद्दा,चीन मुद्दा,व्यापार,रोजगार या सगळ्यावर संयमित पणे मार्ग काढले आणि देशाला एका नव्या उंचीवर नेऊन पोहोचवले.
(20/21)
                    
                                    
                    काश्मीर मुद्दा,चीन मुद्दा,व्यापार,रोजगार या सगळ्यावर संयमित पणे मार्ग काढले आणि देशाला एका नव्या उंचीवर नेऊन पोहोचवले.
(20/21)
                        
                        
                        अश्या या महान भारत मातेच्या सुपुत्रास त्यांच्या जयंती निम्मित मानाचा मुजरा ! 
YOU WILL BE REMEMBERED BY EVERY CITIZEN SHASTRI JI !
#LalBahadurShastriJi
(21/21)
                    
                
                YOU WILL BE REMEMBERED BY EVERY CITIZEN SHASTRI JI !
#LalBahadurShastriJi
(21/21)
 
                         Read on Twitter
Read on Twitter 
                             
                             
                             
                                     
                                    